Saturday, May 4, 2024
Homeनाशिकसिन्नरफाटा येथील फळविक्रेत्याला होता टायफाईड निघाला करोनाबाधित; अशी आहे आजच्या रुग्णांची हिस्ट्री…

सिन्नरफाटा येथील फळविक्रेत्याला होता टायफाईड निघाला करोनाबाधित; अशी आहे आजच्या रुग्णांची हिस्ट्री…

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात दोन अहवाल बाधित आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण सिन्नर फाटा येथील फळविक्रेता आहे. तर दुसरा रुग्ण पाटील नगरमध्ये काल बाधित आढळून आलेल्या महिलेची मुलगी असल्याची माहिती प्राप्त होत आहे. आज रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत नाशिक शहरात ३९ रुग्ण बाधित असून शहरात एकूण २६ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

- Advertisement -

आज नाशिक मनपाकडून दोन्ही रुग्णांच्या बाबत माहिती देण्यात आली. यामध्ये सिन्नर फाटा येथील रहिवाशी हा फळविक्रेता असून त्यास टायफाईड झाल्याने काल (दि. ८) रोजी तपासणीसाठी दाखल करून घेण्यात आले होते.

या रुग्णाचा अहवाल बाधित आला आहे. त्याच्यावर शहरातील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. तर दुसरा रुग्ण नवीन नाशिकमधील  पाटील नगर येथील महिला आहे.

या महिलेची आई कालच करोनाबाधित आढळून आली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  शहरात आज एकूण ४ नवीन करोना बाधीत रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २ रुग्ण नाशिक मधील आहेत तर दोघे मालेगाव येथील कार्यरत पोलीस आहेत. त्यातील १ पोलीस धात्रक फाटा येथील तर दुसरा पोलीस कर्मचारी जैन मंदिर आडगाव परिसरातील रहिवाशी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या