Monday, February 23, 2026
Homeक्राईमNashik Fraud Crime : भवितव्याचे स्वप्न भंगले; नोकरीच्या आमिषाने वडिलांना १२ लाखांचा...

Nashik Fraud Crime : भवितव्याचे स्वप्न भंगले; नोकरीच्या आमिषाने वडिलांना १२ लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्पर्धा परीक्षांच्या अनिश्चिततेत अडकलेल्या मुलाच्या भविष्याचा आधार शोधताना एका निवृत्त पित्याने विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावर ‘ओळखी’चा मुखवटा चढवून एजंटने १४ लाखांचा गंडा (Fraud) घातला. मुलाला नोकरी न लागता केवळ २ लाख रुपये परत करुन उर्वरित १२ लाखांसाठी टाळाटाळ करुन धमकीचे हत्यार उपसले. पंचवटीत उघडकीस आलेल्या या प्रकरणी संशयित नितीन शहाजी धुमाळ (रा. मुसळवाडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

पंचवटीतीली रामवाडी येथील राजेंद्र भिकनराव वाघ (वय ६२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार २८ ते ३१ मे २०२५ दरम्यान घडला. वाघ हे सेवानिवृत्त असून मुलगा (Son) पुष्कराज स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. अपेक्षित यश मिळत नसल्याने कुटुंब चिंतेत होते. याच काळात कोंडेकर यांच्या ओळखीने नितीन धुमाळ याच्याशी संपर्क झाला. धुमाळने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी जवळची ओळख आहे. नातलगांच्या मदतीने मुंबई महापालिकेत (Mumbai Mahapalika) नोकरी लावून देतो,’ असे आश्वासन दिले.

YouTube video player

विश्वास दृढ करण्यासाठी प्रभावी संवाद साधत खात्री निर्माण केली. त्यानंतर कोंडेकर यांच्या मध्यस्थीने वाघ यांनी १४ लाख रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, अनेक महिने कोणतीही कॉल लेटर किंवा हालचाल दिसून आली नाही. नोकरीबाबत विचारणा होताच धुमाळकडून वेळकाढूपणा सुरू झाला. अखेरीस केवळ २ लाख रुपये परत करून उर्वरित १२ लाखांवर टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. दरम्यान, मुलाच्या भवितव्यासाठी केलेली धडपडच आर्थिक फसवणुकीत परिवर्तित झाल्याने या प्रकरणाने स्पर्धा परीक्षांच्या अस्थिरतेचा गैरफायदा घेणार्‍या ‘ओळखीच्या’ साखळीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

‘माझी अधिकाऱ्यांशी ओळख’

पैसे परत मागितल्यावर धुमाळने ‘माझी मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे’ असे सांगत दबावतंत्र वापरले. इतकेच नव्हे, तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. आर्थिक फसवणूक व मानसिक दबावामुळे वाघ यांनी अखेर पंचवटी पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा नोंदवला असून उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करत आहेत.

ठळक मुद्दे

  • धुमाळला चौकशीसाठी हजर राहण्याची ताकीद
  • आज मंगळवारी त्याची सखोल चौकशी
  • इतरांची फसवणूक झाली आहे का, याचा शोध सुरु

ताज्या बातम्या

नाशिक महापालिकेचे हरित कर्जरोखे बुधवारी बाजारात; २०० कोटींपर्यंत निधी उभारण्याचा मानस

0
पंचवटी । प्रतिनिधी panchavati सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी नाशिक महानगरपालिका यांच्यावतीने पहिल्या ‘हरित महानगरपालिका कर्जरोख्यां’ची (ग्रीनशू ऑप्शनसह) सार्वजनिक विक्री जाहीर करण्यात आली आहे .या...