Thursday, July 9, 2026
HomeनाशिकNashik Fraud Crime : ​'आनंदग्राम'मध्ये दुसरा फ्राॅड; ९७ लाख रुपये लाटून तिघे...

Nashik Fraud Crime : ​’आनंदग्राम’मध्ये दुसरा फ्राॅड; ९७ लाख रुपये लाटून तिघे सेल्स मॅनेजर पसार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीतील तारवाला नगर येथील ‘आनंदग्राम’ बांधकाम साईटवर सेल्स मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या त्रिकुटाच्या गुन्हेगारीची साखळी घट्ट असल्याचे समोर आले आहे. शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या (Investment) नावाखाली ग्राहकांना लुटणाऱ्या या टोळीवर दुसरा गुन्हा (Case) दाखल झाला आहे. पहिल्या गुन्ह्यातून धडा न घेता या संशयितांनी पुन्हा एकदा विश्वासघात करत तब्बल ९७ लाख १० हजार रुपयांचा नवा गंडा घातल्याचे उघडकीस आले असून पंचवटी पाेलिसांत (Panchvati Police) दुसरा गुन्हा नाेंद झाला आहे. या टोळीने केवळ सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनाच नव्हे, तर फ्लॅट खरेदीसाठी आलेल्या वृद्ध ग्राहकांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही जाळ्यात ओढून कोट्यवधींची माया गोळा केल्याचे समाेर आले आहे.

- Advertisement -

पहिल्या गुन्ह्यानंतरही या टोळीची फसवणूक सुरूच होती. संशयित श्रीकांत जगनाथ गटकळ (३७), प्रितम राजेंद्र दाणी (४१) आणि रामेश्वर दत्तात्रय सोळंके (३७) यांनी ५ सप्टेंबर २०२५ पासून हा दुसरा डाव रचण्यास सुरुवात केली. अमृतधाम येथील हनुमान नगरातील रहिवासी चेतन चिंधु शिरसाठ (वय ३२) हे याच आनंदग्राम साईटवर काम करतात. सेल्स मॅनेजर श्रीकांत गटकळ याने शिरसाठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फॉरेक्स आणि शेअर्स ट्रेडिंगमध्ये (Share Trading) महिना १० ते ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्याने स्वतःच्या मोबाईलवर विविध ऑनलाईन ट्रेडिंग अ‍ॅप्स दाखवून २० टक्के परतावा खरोखरच दिला. या आमिषाला बळी पडून शिरसाठ व इतर गुंतवणूकदारांनी स्वतःच्या कष्टाची २७ लाख १० हजार रुपयांची पुंजी संशयिताच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली. मात्र, मोठी रक्कम हाती येताच परतावा देणे बंद करून त्यांची फसवणूक करण्यात आली.

​वृद्ध दांपत्य आणि मेहुण्याला चुना

या सेल्स मॅनेजर्सनी फ्लॅट खरेदीसाठी जळगावहून आलेल्या ७० वर्षीय वृद्ध विनोद जगन्नाथ पवार यांनाही सोडले नाही. गटकळने त्यांना ६ महिन्यांत ३० टक्के परताव्याचे आमिष दाखवले. पवार यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मुलीच्या संमतीने, पत्नी प्रतिभा पवार यांच्या खात्यावरून संशयित रामेश्वर सोळंके याच्या खात्यावर ३० लाख रुपये वर्ग केले. पवार यांचे मेहुणे नितीन नारायण पाटील यांनाही परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल ४० लाख रुपये उकळण्यात आले. या दुसऱ्या गुन्ह्यात एकूण ९७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक (Fraud) झाली आहे. गुन्हा दाखल होताच श्रीकांत गटकळ, प्रितम दाणी आणि रामेश्वर सोळंके हे तिघेही पसार झाले आहेत. पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. 

ताज्या बातम्या

दूषित पाण्याने मंत्रालयातील कर्मचारी बेजार

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbaiराज्य प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी सध्या उलटी, जुलाब आणि तापाने त्रस्त आहेत. मंत्रालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत पावसाचे घाण...