Saturday, May 3, 2025
Homeक्राईमNashik Fraud News : पुन्हा सायबर फ्रॉड; शेअर मार्केटच्या नादात गमवले ३७...

Nashik Fraud News : पुन्हा सायबर फ्रॉड; शेअर मार्केटच्या नादात गमवले ३७ लाख रुपये

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेअर मार्केट व आयपीओत गुंतवणूक (Share Market and IPO Investment) करण्यास भाग पाडून शहरातील दोघा ब्रोकरांसह सायबर चोरांनी (Thief) गुंतवणुकदारांना वेगवेगळया दोन घटनांमध्ये तब्बल ३७ लाख रूपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी भद्रकाली आणि सायबर पोलीस ठाण्यात (Bhadrakali and Cyber Police Station) फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

- Advertisement -

होलाराम कॉलनीत राहणाऱ्या गिरीश चंद्रकांत कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे यांना संशयित प्रतिक विकास वैद्य (रा. हॉटेल कामत शेजारी, पुणेरोड, नाशिक) व विवेक खोंडे (रा. वडजाई मातानगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) या ब्रोकरांनी गंडविले. संशयितांनी १ मे २०२२ रोजी कांबळे यांची एमजीरोड (MG Road) येथील एका इलेक्ट्रॉनिक या दुकान परिसरात भेट घेत विश्वास संपादन केला.

यावेळी शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. काही काळ परताव्याची रक्कम देत नंतर गुंतवणुकीची रक्कमही देण्यास टाळाटाळ केली. तर, संबंधित संशयितांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने कांबळे यांनी पोलिसात धाव घेतली. यात विवेक खोंडे यांनी २९ लाख १६ हजार ३०० रूपयांची तर वैद्य याने ९० हजार अशी सुमारे ३० लाख ६ हजार ३०० रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case) करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.

तर शहरातील ३५ वर्षीय व्यक्तीची सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) फसवणूक (Fraud) केली. वेगवेगळया व्हाटसअप क्रमांकावरून जानेवारी महिन्यात तक्रारदाराशी संपर्क साधण्यात आला होता. वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्टॉक मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून भामट्यांनी स्टॉक मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून भामट्यांनी तक्रारदार यांना गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन होताच तक्रारदारास वेगवेगळया बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडून भामट्यांनी ही फसवणूक केली. या घटनेत तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident News : म्हसरुळला हिट ॲण्ड रन; महिला ठार

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road म्हसरुळ (Mhasrul) येथील आरटीओ कॉर्नर (RTO Corner) येथील सिग्नलचे पालन करणाऱ्या वाहनधारकांवर चालकाने भरधाव पिकअप चढविल्याची हृदयद्रावक घटना घडली....