Saturday, November 23, 2024
HomeनाशिकNashik Fraud News : वृद्धास ईडीच्या धाकाने फसविले तर परताव्याच्या अमिषाने गुंतवणूकदारास...

Nashik Fraud News : वृद्धास ईडीच्या धाकाने फसविले तर परताव्याच्या अमिषाने गुंतवणूकदारास गंडा

सायबरचे ठकबाज सुसाट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात गेल्या काही दिवसांपासून दर दोन दिवसांआड सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) नाेंद हाेत असून आता सायबर चाेरट्यांनी एका वयाेवृद्धास ‘ईडी’ कार्यालयातून (ED Office) बाेलत असल्याचे धाक दाखवित २० लाख रुपये उकळले आहेत. तर, दुसऱ्या घटनेत सातपूर (Satpur) येथे दाेघांनी गुंतवणूकदारास याेजनेतील जादा परताव्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या दाेन्ही प्रकरणांत सायबर व सातपूर पाेलिसांत गुन्हे नाेंदविण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

शहरात राहणाऱ्या ७१ वर्षीय वृद्धास सायबर चाेरट्यांनी १ ते ४ ऑक्टाेबर या कालावधीत मोबाईल क्रमांक 9278550972 व व्हॉटसअप क्रमांक 9957024158 या वरुन अचानक चॅटिंग व काॅल करुन संपर्क साधत ‘मी प्रदीप सामंत, अंधेरी पाेलीस स्टेशनमधून बाेलत आहे, असे भासविले. यानंतर तुमचा नरेश गाेयल नावाच्या माेबाईल क्रमांकावरुन (Mobile Number) मनीलाँन्ड्रिंगचे व्यवहार झाले आहेत. ते संशयास्पद असून तुमचा आतापर्यंतचा आर्थिक तपशील, स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती पाेलिसासमक्ष सादर करावी लागेल असे सांगितले. त्यामुळे ‘तुम्ही आमच्या ईडी कार्यालयातील मॅडमसोबत बोलून घ्या’ असे सांगितले.

हे देखील वाचा : Ratan Tata Funeral : ‘पद्मविभूषण’ रतन टाटा अनंतात विलीन

काही वेळाने काॅलवर बाेगस पाेलीस अधिकारी असलेल्या आकांक्षा अग्रवाल हिने वृद्धास ‘तुमचे मनी लाँन्ड्रिंगचे व्यवहार समाेर आले आहेत, कारवाई हाेईल, अटक (Arrested) केली जाईल’, त्यामुळे आम्ही जे सांगू तसे करा असे म्हणूण अन्य संशयितांनी वृद्धास फाेन करुन प्रकरणातून सुटका करुन घ्यायची असेल आहे तर, आम्ही सूचविलेल्या बँक खात्यांमध्ये २० लाख ११ हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. कालांतराने आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे समजताच वृद्धाने सायबर पाेलीस ठाणे (Cyber Police Station) गाठून तक्रार दिली. तपास पाेलील निरीक्षक ढवळे करत आहेत.

हे देखील वाचा : Cabinet Decisions : राज्य सरकारचा धडाका सुरूच; मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत घेतले तब्बल ‘इतके’ महत्त्वाचे निर्णय

बीनामाे ट्रेडिंगचे आमिष

किरण गुलाब निकुंभ(रा. बालाजीनगर, सातपूर, मूळ रा. नगरदेवळा, जि. जळगाव) याला संशयित मयूर कैलास राठोड आणि दिनेश गिरीधर वाघमारे (दाेघे रा. तांबे कॉम्प्लेक्स, सावरकरनगर, नाशिक) यांनी ‘बीनामाे’ या ट्रेडिंगचे आमिष दाखवून जादा आर्थिक परताव्याती हमी दिली. १५ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संगनमत करुन दाेघांनी निकुंभला बीनामाेत पैसे भरण्यास सांगितले. हेच पैसे गुंतविण्याचा बहाणा करत त्याच्या फोन पे, यूपीआयने पेटीएम व रोख ५ लाख ३ हजार रुपये वेळोवेळी घेत पैशांचा परतावा न देता याच रकमेचा अपहार करुन फसवणुक केली. तपास उपनिरीक्षक बटुळे करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या