Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

Nashik Rain News : नाशकात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

नाशिक | Nashik

काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह (Farmer) सर्वसामान्यांना पावसापासून सुटका मिळाली होती. मात्र, कालपासून पुन्हा एकदा राज्यातील विविध भागांत परतीच्या पावसाने (Rain) हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी; आजपासून जोर वाढणार

काल दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत हजेरी लावली होती. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली होती. यानंतर आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पावसाने थोडीशी उघडीप दिली होती, मात्र यानंतर सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा शहरात पावसाने गारांसह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा : Ratan Tata Funeral : ‘पद्मविभूषण’ रतन टाटा अनंतात विलीन

शहरातील मेनरोड, शालिमार, सीबीएससह आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांनी (Citizen) लपण्यासाठी दुकानांच्या (Shop) गाळ्यांचा आधार घेतल्याचे दिसून आले. तर वाहने चालवतांना चालकांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागली. तसेच जिल्ह्यातील सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीसह आदी तालुक्यांत देखील पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील वाचा : Manoj Jarange : छगन भुजबळांवर जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, “येवल्याचा डुप्लिकेट…”

दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील विविध भागांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद काढला आहे किंवा केला आहे, त्या शेतकऱ्यांनी ते झाकून ठेवावे, अन्यथा पावसाचा फटका बसू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Cabinet Decisions : राज्य सरकारचा धडाका सुरूच; मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत घेतले तब्बल ‘इतके’ महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्रातील ‘या’ भागांत कोसळणार जोरदार पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आजपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात रोज भाग बदलत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १२ ऑक्टोबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच १२ ते १६ ऑक्टोबर या काळात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याशिवाय नांदेड, परभणी,हिंगोली, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या