Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik Fraud News : 'स्टार रेटिंग'च्या आमिषाने सुशिक्षित तरुणाची अकरा लाखांची फसवणूक

Nashik Fraud News : ‘स्टार रेटिंग’च्या आमिषाने सुशिक्षित तरुणाची अकरा लाखांची फसवणूक

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

डिजिटल युगात ऑनलाइन पार्ट-टाइम जॉब आणि वर्क फ्रॉम होमचा शोध घेणाऱ्या सुशिक्षित तरुणांना (Young Man) टार्गेट करण्यासाठी सायबर चाेरट्यांनी (Cyber Thieves) आता ‘प्रॉडक्ट रेटिंग’चा नवा फंडा शोधला आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या उत्पादनांना फक्त ५-स्टार रेटिंग द्या आणि १५ ते २० टक्के भरघोस कमिशन मिळवा, असी नवी स्किम सांगून नाशिकमधील एका ३१ वर्षीय तरुणाला तब्बल ११ लाख २५७ रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडकोतील पाटील नगर येथील पीडित तरुणाच्या तक्रारीवरून नाशिक सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पीडित तरुण ऑनलाइन ‘वर्क फ्रॉम होम’चा शोध घेत असताना त्याला एका वेबसाईटची लिंक (Website Link) मिळाली. या वेबसाईटवरील उत्पादनांना रेटिंग देऊन ती विकली गेल्यास १५ ते २० टक्के कमिशन देण्याचे चाेरट्यांनी भासवले. या आधी तरुणाचा विश्वास संपादन करण्यासाठी ९,४०१ रुपये भरण्यास सांगितले. रेटिंग पूर्ण करताच त्याच्या स्क्रीनवरील आभासी खात्यात १५ टक्के कमिशन जमा झाल्याचे दाखवण्यात आले. हा परतावा पाहून तरुणाचा या कामावर पूर्ण विश्वास बसला. जाळ्यात अडकलेल्या तरुणाने ७ ते २८ एप्रिल दरम्यान स्वतःच्या आणि वडिलांच्या बँक खात्यांमधून विविध यूपीआय आयडी आणि बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने ११ लाख २५७ रुपये भरले.

कमिशन काढताना उघडकीस आला प्रकार

​जेव्हा तरुणाने जमा केलेली रक्कम आणि मिळालेले कमिशन स्वतःच्या मूळ बँक खात्यात काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चाेरट्यांनी तांत्रिक कारणे आणि अतिरिक्त कराचे बहाणे सांगून पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सायबर पोलिसांत धाव घेतली. यानंतर, सायबर पोलिसांनी संबंधित बनावट संकेतस्थळ आणि संपर्क साधणाऱ्या व्हॉट्सॲप क्रमांकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुद्दे

-​सायबर पोलिसांचे आवाहन
-कोणतीही अधिकृत कंपनी रेटिंगसाठी पैसे देत नाही.
-काम देण्यापूर्वी समोरून पैसे भरण्यास सांगणारे ९९% मेसेज हे फ्रॉड.
-कोणत्याही आभासी कमिशनच्या आमिषाला बळी पडू नये.
-अनोळखी यूपीआय आयडीवर पैसे पाठवू नये.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...