नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लाडक्या गणरायाला (Ganpati Bappa) निरोप देत असतानाच शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांचा बुडून मृत्यू (Drowned Death) झाल्याने नाशिकमधील (Nashik) गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे. विसर्जनावेळी जिल्ह्यात चौघांचा मृत्यू (Four Death) झाला असून एक जण अद्यापही बेपत्ता आहे.
पावसामुळे (Rain) अनेक नदी नाले ओसंडून वाहत असून अनेक धरणे (Dam) व बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यात पाच जण वाहून गेले असून बेपत्ता तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी अग्निशमन दल व आपदा मित्रने शोध कार्य सुरु केले आहे. प्रवीण शांताराम चव्हाण (२५, चाळीसगाव, जि. जळगाव) असे प्रवाहित पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
दुसरी घटना म्हसरुळ पोलिसांच्या (Mhasrul Police) हद्दीतील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या दगडी खाणीत घडली. शनिवारी दुपारी तीन वाजता चंदर नथू माळेकर (वय २९, रा. म्हसोबावाडी, बोरगड) हा गणपती विसर्जनासाठी विद्यापीठालगतच्या तलावात उतरला असता त्याचा बुडून मृत्यु झाला. याबाबत, म्हसरुळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर, तिसरी घटना सिन्नर येथे घडली. सिन्नर शहराजवळ असणाऱ्या सरदवाडी धरणात ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (४० रा. सिल्वर लोटस स्कूलजवळ, सिन्नर) हा विसर्जनासाठी पाण्यात (Water) उतरला असता पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. दरम्यान, चौथी घटना कळवण तालुक्यातील मौजे देसराने येथे पुनद नदीत घडली आहे. येथे फरशीवरुन पाय घसरून नदीत बुडाल्याने दिनेश बाबुराव राजभोज (वय ३९) यांचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला असून पाचवी घटना नाशिक तालुक्यातील गोवर्धन शिवारात घडली. येथे विष्णू डगळे (वय ३४, रा. गंगापूर) हा वाहून गेला आहे.




