नाशिक । Nashik
यंदाच्या गणेशोत्सवात नाशिक महापालिकेकडून (Nashik NMC) तब्बल २ लाख ५ हजार ८५४ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. मनपाच्या आवाहनाला शहरातील नागरिकांचा (Citizen) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्याच्या दृष्टीने नाशिक महापालिके मार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासमवेतच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा, यासाठी विविध उपक्रम देखील राबविण्यात आले होते.
हे देखील वाचा : Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
काल दहा दिवसाच्या श्री गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) अनुषंगाने नागरिकांनी उत्स्फुर्तपणे गणेश मूर्ती दान करून व निर्माल्य जमा केले. दरम्यान, मूर्ती संकलनात सामाजिक संस्थाचे सहकार्य लाभले. त्यात शहरातील एनसीसी कॅडेट्स, के व्ही. नाईक कॉलेज, के के वाघ अभियांत्रिकी व पॉलीटेक्निक कॉलेज, संदीप फाऊंडेशन, गोखले एज्युकेशन संस्था, रोटरी क्लब आदी संस्थाचा समावेश होता.
हे देखील वाचा : One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे काय? फायदे आणि आव्हाने कोणती? जाणून घ्या सविस्तर
१७४ मेट्रिक टन निर्माल्य
नाशिक शहरातील सहाही विसर्जन ठिकाणांहून एकूण १७४ मेट्रिक टन निर्माल्य मनपाने संकलन केले. त्याच प्रमाणे मनपातर्फे नागरिकांना विसर्जनाकरिता ७२५ किलो अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वाटप करण्यात आले होते. मागील वर्षी एकूण दोन लाख गणेश मूर्तिचे व १५३टन निर्माल्य संकलन करण्यात आले होते.
पंचवटीतून ७८ हजार मूर्ती
मनपाकडे यंदा तब्बल २ लाख ५ हजार मूर्ती दान करण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक ७८ हजार मूर्ती शहरातील पंचवटी विभागातून संकलित करण्यात आला.
४० नैसर्गिक व ४१ कृत्रिम तलाव
पर्यावरण संरक्षण व दृष्टीने नदीपात्रांचे जल प्रदुषण होऊ नये, यासाठी मनपाने केलेल्या मूर्ती दानाच्या आवाहनाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मनपाकडून एकूण ४० नैसर्गिक व ४१ कृत्रिम तलाव मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. मूर्ती संकलनासाठी मनपाचे अधिकारी व सेवक दिवसभर कार्यरत होते.
विभागनिहाय मूर्ती संकलन
पंचवटी-७८६७७
नविन नाशिक-२५२६१
नाशिकरोड-४५१३८
नाशिक पूर्व-१०४२८
सातपूर-३१११८
नाशिक पश्चिम-१५२१३
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा