Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : 'एक देश, एक निवडणुकी'च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर...

Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने (Cabinet) भारतात एक देश, एक निवडणूक (One Nation One Election) या प्रस्तावाला कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने एक देश, एक निवडणूक हा कार्यक्रम राबविण्यासंदर्भातला अहवाल मार्च २०२४ रोजी केंद्राला सोपविला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने काल या अहवालावर शिक्कामोर्तब केले आहे.दरम्यान यावरून आता राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे काय? फायदे आणि आव्हाने कोणती? जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी रात्री उशीरा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “आम्ही केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयाचे स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका असतात. या निवडणुकांत पैसा, वेळ, मनुष्यबळ हे सगळं खर्ची होते. त्याबरोबरच आचारसंहिता (Code of Conduct) लागल्याने अनेक महत्त्वाची कामे थांबतात आणि विकासाचा वेग मंदावतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

हे देखील वाचा : One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला कॅबिनेटचा ‘ग्रीन सिग्नल’?

तसेच पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेवरही भाष्य केले. त्यांना माध्यम प्रतिनिधींनी एक देश एक निवडणूक (One Nation One Election) घेण्याच्या निर्णयाला विरोधकांकडून विरोध करण्यात येत आहे. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, विरोधकांना विरोध करण्याची सवय आहे. मुळात या निर्णयाला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. यामुळे देशाचा पैसा आणि वेळ वाचणार आहे. हा निर्णय देशाच्या हिताचा निर्णय आहे. अशा निर्णयाला विरोध होऊ नये, असे शिंदेंनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या