Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक पदवीधर निवडणूक : 'इतक्या' उमेदवारांची माघार

नाशिक पदवीधर निवडणूक : ‘इतक्या’ उमेदवारांची माघार

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik graduate elections) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सहा उमेदवारांनी माघार (withdraw) घेतली असून आता या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सोळा उमेदवार उभे आहे.

- Advertisement -

काँग्रेस (Congress) व भारतीय जनता पक्षाचा (BJP) एकही अधिकृत उमेदवार नसल्याने आता ही लढत प्रामुख्याने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) व शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने डॉ.सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी दिली होती, परंतु त्यांनी आपला अर्ज न भरता अपक्ष म्हणून पुत्र सत्यजित तांबे यांचा अर्ज भरला. परिणामी काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तर दुसरीकडे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने (Thackeray group) पाठिंबा दिल्याने ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे महाविकासआघाडीचाही (Maha Vikas Aghadi) अधिकृत उमेदवार नसल्याने प्रचार कुणाचा करायचा यावरही ठाकरे गटात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माघार घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे

अमोल खाडे

डॉ. सुधीर सुरेश तांबे

दादासाहेब हिरामण पवार

धनंजय कृष्णा जाधव

राजेंद्र दौलत निकम

धनंजय देविदास विसपुते

- Advertisment -

ताज्या बातम्या