सातपूर | Satpur
नाशिक-अहमदाबाद (Nashik- Ahmadabad) या मार्गावर विमानसेवा देणाऱ्या ट्र्यू जेट (True Jet) कंपनीकडून १ सप्टेंबर पासून अहमदाबाद मार्गे नाशिक- इंदूर विमानसेवा (Nashik-Indore Air Service) सुरू करण्यात येणार असून बुकिंग ला प्रारंभ करण्यात आला आहे….
सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ने निघालेले प्रवासी इंदूरला रात्री ९.४० न वाजता पोहोचू शकतील. सध्या लक्झरी बस (Luxury Bus) किंवा कारने किमान ८ तासाच्या प्रवासासाठी आता विमान सेवेमुळे अवघ्या ३ तासांच्या आत पूर्ण करता येणार आहे.
विमानसेवेची वेळ अशी
अहमदाबादहून सायंकाळी ५.०५ वाजता नाशिक साठी उडान घेउन नाशिक विमानतळावर सायंकाळी ६.२० वाजता पोहोचणार आहे. नाशिकहून सायंकाळी ६.५० वाजता अहमदाबाद साठी निघून अहमदाबाद विमानतळावर रात्री ८.०५ वाजता लँडिंग करणार आहे.
अहमदाबादहून रात्री ८.३० वाजता निघून रात्री ९.४० वाजता इंदूर विमानतळावर लँडिंग करणार आहे. रात्री १०.०५ वाजता इंदूरहून निघून रात्री ११.१५ वाजता अहमदाबादला लँडिंग करणार आहे.
नाशिक-अहमदाबाद साठी किमान २४०० रुपये पडणार आहे तर नाशिक- इंदौर साठी किमान भाडे ३४०० रुपये पडणार आहे.
लवकरच इंडिगो (Indigo), स्पाइस जेट (Spice Jet) विमान कंपन्याही आपल्या सेवा सुरु करण्याबाबत चाचपणी करीत आहेत.