नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकसभेला (Loksabha) तर इथेच होते, विधानसभेलाही होते, आणि आज मनपासाठी मतदान करायला आलोय तर मतदार यादीत नावच नाही, अशी परिस्थिती आज (दि.१५)रोजी महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणी विविध मतदान केंद्रावर प्रकर्षाने दिसून येत आहे. तसेच एकाच घरात राहणार्या चार-पाच मतदारांची नावे दोन-तीन विभिन्न केंद्रांवर आल्याचे प्रकार निदर्शनास येऊ लागले आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील पती, पत्नी, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन मतदान करावे लागत आहे.
हे देखील वाचा : Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सकाळपासून मतदानास सुरुवात; ‘या’ प्रभागांत EVM मध्ये बिघाड झाल्याने उडाला होता गोंधळ
कुटुंबातील सर्वांचे मतदान (Voting) होण्याऐवजी दोघांचे झाले, एक-दोघांचे मतदान करायचे राहिले, अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे गत निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या मनपा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.एकाच घरात राहणार्या मतदारांची नावे तीन-चार वेगवेगळ्या ठिकाणच्या केंद्रावर आल्याने यंदाच्या मनपा निवडणुकीत मतदारांना धावाधाव करावी लागत आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : भाजप उमेदवार बडगुजरांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिस छावणीचे स्वरूप
लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घराघरांतील ऑनलाइन शोधाशोध मतदानापूर्वी घरी येणाऱ्या स्लिपमुळे मतदान केंद्राची माहिती मिळाली आहे. मात्र, यंदा बऱ्याच घरांमध्ये स्लिप न आल्याने अनेकजण ऑनलाइन पद्धतीने मतदान केंद्राचा शोध घेत आहेत. त्यातून एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर आल्याचे पाहून काहींचा उत्साह मावळत असल्याचे चित्र आहे.
हे देखील वाचा : Nashik MC Election : बटण दाबले धनुष्यबाणाचे अन् लाईट लागली…; नाशकातील मतदाराचा मोठा दावा
दरम्यान, मतदानापूर्वी घरपोच येणार्या स्लिप सर्वांनाच न मिळाल्याने ऑनलाईन पद्धतीने शोध घेतला असता घरातील चार-पाच मतदारांची नावे दोन ते तीन विभिन्न केंद्रांवर असल्याचे पाहून नागरिकांना धक्का बसत आहे. त्यातही नेमके ज्येष्ठ नागरिकांचे नाव घरापासून लांबच्या केंद्रावर, महिलांचे नाव तिसर्याच केंद्रांवर असे प्रकार घडल्याने काही कुटुंबांत कुटुंब प्रमुख मतदान करून आल्यानंतर त्यांना ज्येष्ठांना दुसर्या केंद्रावर (Voting Centre) घेऊन जाण्याची वेळ येत आहे.




