Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik MC Politics : भाजप विरोधकांची बेरीज पन्नास तरीही महापौर पदाच्या रिंगणात;...

Nashik MC Politics : भाजप विरोधकांची बेरीज पन्नास तरीही महापौर पदाच्या रिंगणात; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेत (Nashik NMC) स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित केल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. भाजपकडे (BJP) १२२ पैकी ७२ जागांचे भक्कम संख्याबळ असल्याने बिनविरोध निवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका सीमा विशाल पवार यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Mayor Election : भाजपला नगरसेवकांवर भरोसा नाय का? महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली विशेष खबरदारी

YouTube video player

महापालिकेतील सद्यस्थितीत भाजपकडे ७२ जागा असून त्यांना स्पष्ट बहुमत आहे. उर्वरित सर्व पक्षांची बेरीज केली असता एकूण ५० जागा होतात. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) २६, शिवसेना (उबाठा) १५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४, काँग्रेस ३, मनसे १ आणि अपक्ष १ अशी विभागणी आहे. त्यामुळे भाजपविरोधातील सर्व पक्ष एकत्र आले तरीही बहुमताच्या ६२ आकड्यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजप एकहाती तब्बल २२ जागांनी पुढे असल्याने सत्तेसाठी कोणत्याही राजकीय तडजोडीची गरज नसल्याचे चित्र आहे.

असे असतानाही उबाठा गटाने महापौर पदासाठी (Mayor Post) उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निर्णयामागे केवळ निवडणूक नव्हे, तर राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (दि. ३) हा शेवटचा दिवस होता. भाजपने सिंहस्थ मेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानुसार भाजपकडून दोघांनीही अर्ज दाखल केले.

हे देखील वाचा : Nashik Fraud Crime : पहिला विवाह लपवून दुसरा संसार; ‘मॅरेज फ्रॉड’मधून ४४ लाखांची लूट, सहा तोळे सोने गायब

दरम्यान, उपमहापौर पदासाठी चुरस वाढली असून शिवसेना (शिंदे गट) कडून प्रवीण तिदमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केल्याने एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई व ठाणे महापालिकेतील सत्तावाटपाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही (Nashik) युतीचे संकेत मिळत असून, मच्छिंद्र सानप यांचा अर्ज मागे घेऊन त्यांना स्थायी समिती सभापतिपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्यापर्यंत घडामोडींची शक्यता

संख्याबळ भाजपच्या बाजूने असले तरी विरोधकांची उमेदवारी आणि उपमहापौरपदावरील स्पर्धेमुळे आगामी काही दिवसांत नाशिकच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी व मालट्रकच्या अपघातात एक ठार तर एक...

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar Manmad Highway) आज दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी...