नाशिक | Nashik
नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे. यानंतर आता शिवसेना (शिंदे गट) नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना मुंबईला बोलविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : मतमोजणीला सुरुवात; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंनी विजयी होण्याचा केला दावा
मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीत विजयी होताच गोकुळ गिते यांना मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी फोन केल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी गिते यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलविले असल्याचा निरोप दिल्याचे समजते. यासाठी एका खास विमानाची देखील व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. यानंतर गोकुळ गिते आज (सोमवारी) दुपारच्या सुमारास विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याचे बोलले जाते.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी
दरम्यान,विजयी उमेदवार गोकुळ गिते हे आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईत (Mumbai) नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
गिते किती मतांनी विजयी झाले?
नाशिक विधानपरिषद निवडणुकीचे (Election) एकूण ६१९ मतदान (Voting) होते, त्यापैकी ६१८ मतदान (Voting) झाले होते. त्यानंतर आज (सोमवारी) मतमोजणीवेळी १३ मते अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे ३०३ चा कोटा ठरविण्यात आला. त्यामध्ये गिते यांना ३५७ तर दराडे यांना २४८ मते मिळाली. त्यामुळे गिते हे पहिल्याच फेरीत १०९ मतांनी विजयी झाले.




