नाशिक | Nashik
संपूर्ण राज्यात चर्चेत राहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) मतमोजणीच्या निकालात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) विजयी झाले आहेत. तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. दरम्यान गिते विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : मतमोजणीला सुरुवात; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंनी विजयी होण्याचा केला दावा
या निवडणुकीत (Election) एकूण ६१९ मतदान (Voting) होते, त्यापैकी ६१८ मतदान (Voting) झाले होते. त्यानंतर आज (सोमवारी) मतमोजणीवेळी १३ मते अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे ३०३ चा कोटा ठरविण्यात आला. त्यामध्ये गिते यांना ३५७ तर दराडे यांना २४८ मते मिळाली. त्यामुळे गिते हे पहिल्याच फेरीत १०९ मतांनी विजयी झाले.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election Result : नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर राडा; दराडे-गिते यांच्यात शब्दिक बाचाबाची
दरम्यान, प्रत्यक्ष निकालापूर्वी आज मतमोजणी केंद्रावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला होता. गोकुळ गिते यांनी मतमोजणी कक्षात पोहोचताच नरेंद्र दराडे यांचे बंधू आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेतला होता. यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कोणत्याही विद्यमान लोकप्रतिनिधीला मतमोजणी कक्षात प्रतिनिधी म्हणून बसता येत नाही, असा मुद्दा मांडत गीतेंनी वकिलांना पाचारण केले होते.




