Wednesday, August 19, 2026
HomeनाशिकKasara Ghat Landslide: नाशिक-मुंबई महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली, वाहतुक संथ...

Kasara Ghat Landslide: नाशिक-मुंबई महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळली, वाहतुक संथ गतीने

इगतपुरी । प्रतिनिधी
नाशिक शहरासर जिल्ह्यात अनेक तालुक्यात रविवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत इगतपुरी तालुक्यात जवळपास २०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. असे असतानाच नाशिक-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या जुन्या कसारा घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात हिवाळा पाँईट जवळ काही प्रमाणात डोंगरावरून दरडीसह माती व दगड रस्त्यात पडल्याची घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्ध पातळीवर रस्त्यामधील दरडी हटवुन महामार्ग सुरळीत केला.

- Advertisement -

Nashik Rain News: पालघरवर घोंघावणारा भोवरा वेगळ्या दिशेने सरकला, नाशिकवरील ढगफुटीचं संकट टळलं, जिल्हा प्रशासनाची महत्वाची माहिती

इगतपुरी तालुक्याला काल पासून रेड अलर्ट दिल्यामुळे व ढगफुटी होणार असल्याच्या माहितीमुळे प्रशासन अलर्ट मोडवर होते. त्यामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाने दरड हटवली असुन कसारा घाटातून वाहतुक संथ गतीने सुरळीत चालू आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासात इगतपुरी तालुक्यात २०० मिमी. पावसाची नोंद झाली असून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद होणार आहे.

Nashik Rain News: नाशिकसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे, ‘रेड अलर्ट’मुळे पर्यटनस्थळे बंद

जिल्ह्यात किती मिलीमीटर पाऊस?
कळवण -४०
नांदगाव-१
सटाणा बागलाण – ४७
निफाड – ४५.२
सुरगाणा – १४९
सिन्नर – ७४
येवला – १५
दिंडोरी – ५८
पेठ – ६१
इगतपुरी – २००
पिंपळगाव बसवंत – ५१.५
देवळा – ४०
त्र्यंबकेश्वर – १२५

ताज्या बातम्या

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावेत – पालकमंत्री गिरीश...

0
नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणारी विविध विकास...