Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक - मुंबई प्रवास होणार अवघ्या अडीच तासात

नाशिक – मुंबई प्रवास होणार अवघ्या अडीच तासात

इगतपुरी । Igatpuri

समृद्धी महामार्ग आणि नाशिक मुंबई महामार्ग क्र. ३ यांच्यात उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ४८ कोटी रुपयांच्या खर्चाला तत्त्वतहा मान्यता दिली आहे.

- Advertisement -

यामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे सहा पदरी उड्डाण पुल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून आता अवघ्या अडीच तासाच नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. वडपे ते गोंदे या दरम्यानच्या महामार्गाचा सहा पदरी करणाचा प्रस्तावही लवकरच मंजूर होणार आहे.

समृद्धी महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून वेगाने सुरु आहे. नाशिक मुंबई महामार्ग क्र. तीन आणि समृद्धी महामार्ग या दोन ही महामार्गांमध्ये अंतर असल्याने प्रवाशांना कनेक्टीव्हीटीची मोठी अडचण होत होती.

ही दोन्ही महामार्ग पिंप्री सदो शिवारापासून अगदी जवळ आहेत. वरील दोन ही महामार्गांची जोडणी नसल्याने याठिकाणी सतत वाहतूक ठप्प होत असते.

तसेच या ठिकाणी रोजच अनेक लहान मोठे अपघात होत असतात. परिणामी वाहतूक कोलमडून पडत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबना होत असते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रिंपी सदो शिवारात वरील दोन ही महामार्गांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाला जानेवारी महिन्यात मान्यता दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रिंपी सदो येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ४८ कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मान्यता दिली आहे.

यापैकी १० कोटी रुपये नॅशनल हायवे ( राष्ट्रीय महामार्ग ) तर उर्वरित ३८ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ देणार आहे. या उड्डाण पुलाची लांबी सुमारे ७८ मीटर असणार असून हा उड्डाण पुल सहा पदरी असणार आहे. गोंदे पर्यंत महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या प्रस्ताव ही आता लवकरच मार्गी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या