नाशिक | Nashik
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) महत्त्वाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विद्यापीठ (University) स्थापन करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. दरवर्षीप्रमाणे आज (रविवारी) मविप्रची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत स्वतंत्र्य विद्यापीठ स्थापन करण्यावरून दोन्ही बाजूंचे सभासद आमनेसामने आल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे सभेत चांगलाच राडा झाला.
यावेळी सभेत सत्ताधाऱ्यांकडून मविप्र विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शविला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून गोंधळात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तर विरोधकांनी हा प्रस्ताव नाकारला. यावेळी विरोधकांनी सभागृहात ‘नाही, नाही’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना गोंधळातच सभा आटोपती घ्यावी लागली.
दरम्यान, आज सकाळीच मविप्रचे अध्यक्ष सुनील ढिकले (Sunil Dhikle) आणि सरचिटणीस नितीन ठाकरे (Nitin Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवारांनी मविप्र संस्थेत (MVP Sanstha) स्वयंम सहाय्यित विद्यापीठ (University) स्थापन करण्याचा निर्णय विचाराधीन असला तरी त्या विद्यापीठाला आपली पसंती नाही असे सुनील ढिकले यांना सांगितले होते. तर नितीन ठाकरे यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संस्थेचे विद्यापीठ निर्मिती ही काळाची गरज असल्याचे म्हटले होते.




