Monday, May 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : नाशिकचा प्रवास 'घातक'; गेल्या पाच वर्षांत ११०० निष्पापांचा बळी

Nashik News : नाशिकचा प्रवास ‘घातक’; गेल्या पाच वर्षांत ११०० निष्पापांचा बळी

शहरात अट्ठावीस ब्लॅकस्पॉट तरीही बैठकांवरच जोर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) रस्ते सुरक्षेचा (Road Sefty) प्रश्न के वळ कागदावरच मर्यादित राहिला की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या पाच वर्षांत ११०० निष्पापांचा बळी जाऊनही प्रशासन अद्याप लालफितीच्या कारभारात अडकले आहे. शहरातील २८ धोकादायक ब्लॅकस्पॉटचे अद्याप स्वतंत्र रोड सेफ्टी ऑडिट झालेले नाही. केवळ पाहणी आणि अहवालांच्या पलीकडे जाऊन रस्ता सुरक्षा समितीने प्रत्यक्षात काय दिवे लावले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

नाशिकमधील २८ ठिकाणे अधिकृतपणे ब्लॅकस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी (Collector) यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता समितीच्या बैठका नियमित होतात. मात्र, उपाययोजनांच्या नावाने आनंदीआनंद आहे. महापालिकेने के वळ १२ ब्लॅकस्पॉटवर तोकड्या उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी उर्वरित १६ ठिकाणांकडे एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीसारख्या यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. वैज्ञानिक पद्धतीने रोड सेफ्टी ऑडिट करून तातडीने रस्ते रचनेत बदल करणे अपेक्षित होते. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप साधे गतिरोधक किंवा सिग्नलची व्यवस्थाही सुधारलेली नाही. यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव नाशिककरांच्या जीवावर बेतत आहे.

राज्यात सातपट पुरुषांचे मृत्यू!

रस्ते अपघातांची दाहकता केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यात भयावह आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२६ या पाच वर्षांच्या काळात राज्यात तब्बल १ लाख ७३ हजार ७७१ अपघात (Accident) झाले आहेत. त्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण ६७,८३७ पुरुषांचा अपघाती मृत्यू झाला, तर ८,८४७महिलांना प्राण गमवावे लागले. म्हणजेच महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूची संख्या सातपट अधिक आहे.

शहरातील मृत्यूचे हे आहेत सापळे

द्वारका सिग्नल व गडकरी चौक : सातत्याने होणारी वाहतूककोंडी आणि अपघातांचे केंद्र.
सीबीएस सिग्नल व आडगाव नाका : पादचाऱ्यांसाठी अत्यंत असुरक्षित भाग.
कार्बन नाका व राऊ हॉटेल परिसर : हायवेवरील अवजड वाहनांमुळे मृत्यूचा धोका.
वेदमंदिर व दत्तमंदिर परिसर : चुकीची रस्ता रचना आणि अज्ञान.

नाशिकची आकडेवारी

एकूण निश्चित ब्लॅक स्पॉट : २८ ठिकाणे
रस्ते अपघातातील एकूण मृत्यू : ११०० (२०१७-२०२२)

यंत्रणांनुसार जबाबदारी

महापालिका : १२ ब्लॅकस्पॉट
एनएचएआय (राष्ट्रीय महामार्ग) : ०८
एनएच पीडब्ल्यूडी : ०३
पीडब्ल्यूडी : ०३

ताज्या बातम्या

Ahilyanagar Police : अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार...

0
अहिल्यानगर । प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता म्हणून घेतल्या जाणाऱ्या 'मॉक ड्रिल' दरम्यान अहिल्यानगरमध्ये एक मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयात प्रात्यक्षिके...