Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासीसीटीव्ही फुटेज असूनही लागेना छडा!

सीसीटीव्ही फुटेज असूनही लागेना छडा!

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सराफ बाजारातून एका व्यापर्‍याची 20 लाखाची रोकड असलेली बॅक चोरट्यांनी गुरूवारी दुपारी पळवली. या चोरट्यांचे सीसीटिव्ह फुटेज मिळूनही अद्याप चोरटे पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत…

- Advertisement -

सोने चांदीचे दागिणे खरेदीसाठी आलेल्या व्यापार्‍याची लूट झाल्याची घटना गुरूवारी (दि.29) दुपारी 4 वाजता सराफ बाजारात घडली. याप्रकरणी भरत मधुकर पवार (रा. मेरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार यांचे अशोकनगर येथे सराफी पेढी आहे. सोने चांदीचे दागिणे खरेदीसाठी ते नेहमी सराफ बाजारात येत असतात.

नेहमीप्रमाणे ते दुपारी 4 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून सराफ बाजारता आले होते. त्यांनी कोणाच्या लक्षात येऊ नयेत म्हणुन मुद्दाम 20 लाख रूपये असलेली पैशांची पिशवी डिकीत न ठेवता कॅरीअरला बांधुन आणली होती. परंतु त्यांच्यावर पाळत ठेवून पदचारी चोरट्यांनी गर्दीचा फायदा उखलत अलगद कॅरीअरची बॅग उडवली व पसार झाले. पवार यांच्या ही बाब लक्षात येईपर्यंत चोरटे पसार झाले होते.

पवार यांनी तात्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यास माहिती दिली. माहिती मिळताच सरकारवाडाचे वरिष्ठ निरिक्षक हेमंत सोमवंशी यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम सुरू केली.

या भागातील सीसीटिव्ह तपासले असता चोरट्यांचे चेहरे पोलीसांना मिळाले आहेत. तसेच या घटनेत 3 चोरट्यांचाही सहभाग आढळून आला आहे. मात्र शहर पोलीसांनी दिवसभर विविध ठिकाणी शोध घेऊनही चोरटे पोलीसांच्या हातील लागलेले नाहीत.

याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता काही पुरावे हाती लागले आहेत. मात्र अद्याप आमचा तपास सुरू असून लवकरच चोरटे ताब्यात असतील असे सांगीतले. सनांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी सराफ बाजार तसेच रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार परिसरात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या