येवला | प्रतिनिधी | Yeola
तालुक्यातील हडप सावरगाव (Hadap Savargaon) येथे २० ट्रॉली मका (Maize) चारा जळून खाक झाला आहे. हडप सावरगाव येथील बाळू कोल्हे या शेतकऱ्याने (Farmer) आपल्या जनावरांसाठी साठवलेला २० ट्रॉल्या मक्याचा चारा शॉर्टसर्किट मुळे आग लागून जळून खाक झाला.
- Advertisement -
वाळलेला चारा (Fodder) असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने आग (Fire) विझवता आली नाही. साठवून ठेवलेला पूर्ण चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामुळे आता पुन्हा विकतचा चारा घेण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे.
दरम्यान, अगोदरच बदलत्या वातावरणाचा फटका सर्व पिकांना बसत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना चारा जळून खाक (Burn) झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.