Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिकच्या तरुणाने चिंचोलीत केली आत्महत्या

नाशिकच्या तरुणाने चिंचोलीत केली आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी

नाशिकहून दुचाकीने प्रवास करीत जळगाव तालुक्यातील चिंचोली  गाठली. त्यानंतर चिंचोली शिवारामधील एका शेताच्या विहिरीत  21 वर्षीय  तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. रितेश राजेंद्र लाडवंजारी (वय 20 रा श्रमिक नगर, नाशिक) असे मयताचे नाव असून घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू दिसून आला. रितेशने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला की घातपात झाल्याचाही संशय व्यक्त केला जात  आहे. रितेशने नाशिकहून चिंचोली शिवारातच आत्महत्या का केली? असा प्रश्न अनुत्तरीत आहे.

- Advertisement -

नाशिक येथील श्रमिक नगरात राजेंद्र लाडवंजारी हे पत्नी व मुलगा रितेश यांच्यासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी रितेश हा दुचाकी (क्रमांक एम एच 15, एफ जी 3093) ने नाशिकहून जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे आला होता. रितेशचे नातेवाईक ललित भास्कर घुगे हे चिंचोली येथे राहत असून ललीत हा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात केला असता त्यांना नाशिक येथील मावसभाऊ रितेश याची दुचाकी उभी दिसली. रितेशचा शोध घेतला असता, शेतातील विहिरीच्या काठावर रितेशची चप्पल दिसली.

मात्र, रितेश कुठलेही दिसत नसल्याने ललितने रितेशचे मुक्ताईनगर येथील मामा राजेंद्र शंकर पालवे यांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर  रितेशचे मामा राजेंद्र पालवे यांनी सकाळी दहा वाजता चिंचोली गाठून घटनेची माहिती जाणून घेतली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक संदीप हजारे, हे. कॉ. जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, अतुल पाटील, किशोर बडगुजर, दीपक चौधरी, भूषण सोनार व चिंचोलीचे पोलीस पाटील मुकेश पोळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

गावातील काही तरुणांनी विहिरीत शोध घेतला असता तरुणाचा मृतेदह मिळून आला. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर राजेंद्र पालवे यांनी मयत रितेश हा त्यांचा भाचा असल्याची ओळख पटविली.रितेश हा नाशिकहून थेट चिंचोली येथे ललीत घुगे यांच्या शेतात आत्महत्या केली.  रितेशने आत्महत्येपूर्वी आईवडिलांचे एका कागदावर संपर्क क्रमांक लिहून दुचाकीवर ठेवलेला कागद पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या