Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : गंगापूर धरणातून चार वाजता २१३२ क्युसेसने विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा...

Nashik News : गंगापूर धरणातून चार वाजता २१३२ क्युसेसने विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये (Trimbakeshwar Taluka) रात्रभर मुसळधार पाऊस (Rain) झाला असून ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहताना दिसून आले. जणू त्र्यंबकेश्वरमध्ये महापूर सदृष चित्र होते. या पावसाचे पाणी गंगापूर धरणात वाढल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

त्यामुळे गंगापूर धरणातील (Gangapur Dam) चार वाजता २१३२ क्युसेसने विसर्ग करण्यात करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी सांगितले. याशिवाय नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरी प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही शहाणे यांनी म्हटले आहे.

YouTube video player

जिल्ह्यात सर्व दूरच पावसाने जोर धरला असल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह वेगाने वाढला आहे. दारणा धरणातून (Darna Dam) ९३९ क्यूसेस गतीने विसर्ग वाढवण्यात आले आहे. पालखेड धरणातून ७९६ गतीने विसर्ग वाढवण्यात आले असून त्यामुळे १५९२ क्यूसेस गतीने विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वरमधून (Nandur Madhameshwar) सर्व धरण समूहातून होणार्‍ंया पाण्याचा विसर्ग एकत्रित छत्रपती संभाजीनगरच्या नाथसागरसाठी केला जातो.

दरम्यान, बुधवारी १० ते १२ वाजेपर्यंत विसर्ग शून्य होता. त्यानंतर पाणी पातळीत वाढ झाल्याने विसर्ग सुरू करण्यात आला. सकाळी सहा वाजता १६१४ क्यूसेस गतीने विसर्ग, सकाळी नऊ वाजता वाढवून ४८४२ क्यूसेस गतीने विसर्ग तर सकाळी दहा वाजता १२,६२० क्युसेस गतीने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे धरण पाणलोट परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाद्वारे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...