नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तिसरा श्रावण सोमवारनिमित्त (Third Shravan Monday) एसटी बस वाहतुकीचे (ST Bus) नियोजन करण्यात आले आहे. तब्बल २७० बसेस त्यासाठी सज्ज ठेवल्या आहेत. रोजच्या १६० फेऱ्या व्यतिरिक्त या बसेस आहेत.
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी शिव भक्तांची तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. १० ऑगस्टपासून दुपारी १२ ते तिसरा सोमवार (दि. ११) रात्री आठ वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी बसेस वगळून अन्य सर्व खासगी वाहनांवरील वेळेत प्रवेश बंद राहणार आहे. म्हणजेच खासगी वाहतूक बंद राहील.
दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) मार्गे जव्हारकडे (Jawhar) जाणारी जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिककडे येणाऱ्या अशा खासगी वाहनांना (Vehicles) वरील काळात प्रवेश (Entry) राहणार नाही.
नाशिककडून येणारी वाहने खंबाळा पार्किंग
जव्हार – गिरणारेकडून येणारी वाहने आंबोली पार्किंग. तर इगतपुरी, घोटीकडून येणारी वाहने पहिले टी पॉइंट येथे पार्किंग होतील. येथून एसटी महामंडळाच्या बसेसने शटल सेवेने हे भाविक त्रंबकेश्वर नगरीकडे येतील. त्र्यंबकेश्वर बसस्थानक हे वरील काळात सिंहस्थ स्थानक गजानन महाराज मंदिरासमोर राहणार आहे. नाशिक येथून १९० बसेस, पहिने ते त्र्यंबक, अंबोली ते त्र्यंबक, घोटी ते त्र्यंबक प्रत्येकी १० व खंबाळे ते त्र्यंबक ५० बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. साध्या बसला ५१ रुपये तर इ. बसचे ७३ रुपये भाडे आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारची गर्दी कमी होईपर्यंत या बसेस सुरु राहणार आहे.
सिटीलिंक बसेसची व्यवस्था
सिटीलिंकच्या (Citilink) आज (रविवार) आणि सोमवार (दि. ११ ) रोजी असे सलग दोन दिवस या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर मार्गे निमाणी या मार्गावर एकूण २८ बसेस सोडण्यात येतात. त्यानुसार या २८ बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर ११२ फेर्या तर त्र्यंबकेश्वर ते नाशिकरोड ११२ फेर्या अशा एकूण २२४ फेर्या नियमित चालविण्यात येतात. या नियमित फेर्यांव्यतिरिक्त रविवार (दि.१०) आणि सोमवार (दि.११) रोजी प्रत्येक दिवशी २० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यामध्ये निमाणी ते त्र्यंबकेश्वर एकूण १० बसेस तर नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर एकूण १० बसेस जादा सोडण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी नियमित २८ तसेच जादा २० अशा एकूण ४८ बसेस त्र्यंबकेश्वर करीता मार्गस्थ करण्यात येणार आहेत. या ४८ बसेसच्या माध्यमातून सुमारे ३८४ फेऱ्या भाविकांच्या सेवेकरिता करण्यात येतील.




