Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : नवरात्रोत्सवासाठी अतिरिक्त पोलीस; 'एसआरपीएफ' सह विशेष पथके तैनात

Nashik News : नवरात्रोत्सवासाठी अतिरिक्त पोलीस; ‘एसआरपीएफ’ सह विशेष पथके तैनात

प्रत्येक दोन तासांनी बंदोबस्ताचा आढावा

नाशिक | Nashik | Nashik

जिल्ह्यात आज (सोमवार) पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी (Navratri) पोलिसांनी (Police) बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे. सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले असून जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त पथकेही तैनात करण्यात आली आहेत. यात्रोत्सवासह गर्दी, हॉटेल्स, लॉजेस, संवेदनशील ठिकाणे आदींवर दहशतवादविरोधी पथकाची बारीक नजर असणार आहे.

- Advertisement -

दरवर्षी मुंबईनाका (Mumbai Naka) येथे नाशिकची ग्रामदेवता कालिका माता, भगूर येथे रेणुका देवी मंदिराचा मोठा यात्रोत्सव भरत असतो. जिल्ह्यात तीसपेक्षा जास्त ठिकाणी यात्रा आयोजित असून सर्व पोलीस पथके, पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण करून तो तैनात करण्यात आला आहे. नाशिक शहरात (Nashik City) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) आणि जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये शहर व जिल्ह्यात बंदोबस्ताची आखणी झाली आहे. सप्तशृंगी देवी यात्रोत्सवाच्या संपूर्ण बंदोबस्ताचे ते प्रभारी अधिकारी आहेत.

YouTube video player

दरम्यान, नाशिक ग्रामीणच्या (Nashik Rural) स्थानिक गुन्हे शाखेस सराईत, भुरट्या चोरांसह फरार व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा माग काढण्याचे निर्देश उत्सवकाळात देण्यात आले आहेत. त्यामुळे जल्लोषात होणारा नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तातडीने पोलीस मदत अपेक्षित असल्यास ‘डायल ११२’वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

असा असेल बंदोबस्त

जिल्ह्यात सप्तशृंगी गड, चांदवडची रेणुका देवी, येवल्यातील जगदंबा देवी, इगतपुरीची घाटनदेवी या ठिकाणी मोठ्या स्वरुपातील यात्रेची नोंद पोलिसांनी केली आहे. यासह २१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३० महत्त्वाच्या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होईल. कालिका देवी मंदिर यात्रोत्सवात पहाटे तीन वाजेपासूनच महिला भाविकांची गर्दी असते. पहाटेच्या काकड आरतीसाठी शहरातील विविध भागातून भक्त मंदिरात पायी येतात. त्यामुळे पहाटे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्तीचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत. तर यात्रामार्गावरही पोलीस पथकांची पायी गस्त असेल.

अशी होणार कार्यवाही

  • घातपातविरोधी पथक, शीघ्र कृतिदल तैनात
  • महत्त्वाच्या यात्रांमध्ये एटीएस पथक पाहणी करणार
  • मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा
  • बॉम्ब शोध व नाशक पथकातर्फे मंदिरांची तपासणी
  • सुरक्षा व पाहणीचे प्रमाणपत्र ठाणे प्रभारींना देणे
  • यात्रामार्गावर पायी गस्त

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...