नाशिक | Nashik
मालवणमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. त्या निषेधार्थ संताप व्यक्त करत राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे (NCP) शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुक आंदोलन करून जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिंडोरी लोकसभा अध्यक्ष रविंद्र पगार, नाशिक लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, योगिता आहेर उपस्थित होते.
हे देखील वाचा : Nashik News : शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मानवी साखळीचा आधार घेऊन काढावी लागतेय वाट
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा (Statue) दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी आहे. अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला, ही धक्कादायक बाब आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे यावरून समोर येते. सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरूष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे भव्यदिव्य स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सीबीएस येथे असलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून मूक आंदोलन करून निवेदनाद्वारे करण्यात आली.
हे देखील वाचा : Nashik News : युवती आत्महत्याप्रकरणी संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
यावेळी रंजन ठाकरे म्हणाले की, मागील आठ महिन्यापुर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण तीन दिवसांपूर्वी पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे माझ्यासह देशभरातील सर्व शिवशक्तच्या मनात तीव्र नाराजी आणि दुसर्या बाजूला संताप व्यक्त होत आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आज देखील सुस्थिती आहे. पण आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा कोसळतो. यावरून त्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. राज्य सरकारने (State Government) यापुढील काळात पुतळा उभारताना विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Gujarat Floods : गुजरातमध्ये पावसाचे थैमान; २६ जणांचा मृत्यू, तर १८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
दरम्यान, याप्रसंगी योगेश निसाळ, चेतन कासव, डॉ. योगेश गोसावी, प्रमोद सोनवणे, अमोल नाईक, नितीन चंद्रमोरे, अजय खांडबहाळे, निर्मला सावंत, शंकर मोकळ, राजाराम धनवटे, जीवन रायते, आसिफ मुळाणी, सागर लामखेडे, साहेबराव पेखळे, योगेश दिवे, नाना पवार, बाळासाहेब काठे, संतोष भुजबळ, अपर्णा खोत, माधुरी एखंडे, अपेक्षा अहिरे, नलिनी वनजे, रोहीणी रोकडे, सोपान कडलग, सचिन चांदवडे, प्रशांत कोल्हे, गोकुळ पाटील, भावेश निर्वाण, सुरज चव्हाण, हरिष महाजन, वजाहत शेख, अक्षय धनवटे, विलास वाघ, हेमंत कांबळे, शुभम गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा