Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik News: रिक्षाचालकांचे 'गुंडाराज' निशाण्यावर; राजाश्रयातील गुंडांना 'फटाके' दिल्यावर चौकातील थांब्यांवर 'स्ट्राईक'

Nashik News: रिक्षाचालकांचे ‘गुंडाराज’ निशाण्यावर; राजाश्रयातील गुंडांना ‘फटाके’ दिल्यावर चौकातील थांब्यांवर ‘स्ट्राईक’

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात दिवाळीपूर्वी पोलिसांकडून ‘गुन्हेगारी’ साफ केली जात असून शहरवासियांना जेरीस आणणाऱ्या ‘मुजोर’ रिक्षाचालकांवर आता कठोर कारवाई आरंभली जाणार आहे. यात निष्कलंक चालकांना ‘सूट’ मिळणार असून नियमांचे उल्लंघन, गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांसह रेकॉर्डवरील चालकांना ‘मार्गशीर्ष अर्थात अग्रहायण मासात आल्हाददायक ‘हिसका’ दाखवला जाणार आहे.

शहरातील काही मुजोर रिक्षाचालकांनी निर्जजपणाचा कळस गाठून सर्वच सीमा पार केल्याचे पुणे रोडवर एप्रिल २०२५ मध्ये घडलेल्या एका घटनेनंतर समोर आले होते, रस्त्याने जाणाऱ्या २० वर्षीय पीडितेसमोर तडीपार रिक्षाचालकाने नग्न होत पाठलाग करून अश्लिल शब्द वापरले होते. मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच, सीसीटीव्ही व अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक झाली होती. मात्र, त्यानंतर, शहरातील पंचवटी कारंजा, आडगाव नाका, द्वारका चौक, मुंबईनाका, दिंडोरी रोड, आरटीओ कॉर्नर, तवली फाटा, म्हसरुळ, दसक, नांदूरनाका, सीबीएस, शालिमार, फुलेनगर, ठक्कर बजार, टाकळी, जेलरोड, उपनगर, नेहरु नगर, आनंदनगर, देवळाली गाव, नाशिकरोड या ठिकाणी काही सराईत रिक्षाचालकांची मुजोरी गेल्या काही वर्षांपासून वाढतच आहे. या भागात पोलिसांनी रात्री सात वाजेनंतर सरप्राईज व्हिजीट करुन रिक्षाचालकांच्या कागदपत्रांसह ब्रेथ अॅनालायझरने तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सुरु असलेली रिक्षाचालकांवरील विशेष कारवाई बंद झाली असून ती अविरत सुरु ठेवण्याची मागणी स्थानिकांसह परजिल्ह्यातील प्रवाशांनी केली आहे. त्यानुसार, आता दिवाळीसह अन्य सणोत्सव पार पडताच, काही रिक्षाचालकांना हेरले जाणार आहे. प्रसंगी त्यांच्या रिक्षा जमा केल्या जाणार असून काहींसाठी पोलीस ठाणेनिहाय ‘भंडारा’ वाटप केला जाणार आहे. त्यादृष्टीने शहर पोलिसांसह स्थानिक पोलिस ठाणे व वाहतुक शाखेने नियोजन सुरु केले आहे.

YouTube video player

भंडाऱ्याचे मानकरी
-चेनस्नॅचिंगसह अन्य गंभीर गुन्हे नोंद असणारे.
-मद्य वा स्वस्त नशा केल्यानंतर ‘गैरकृत्य करणारे,
-तडीपारी करुनही शहरातच वास्तव्य करणारे.
-रस्त्यावर लूट, राडा घालणारे, मोकळ्या ठिकाणी रिक्षाच मद्यपान,
-प्रवाशांशी गैरवर्तन करुन विनयभंग, छेड काढणारे,
-गुन्हेगारीत सहभाग असणारे, गणवेश न घालणारे

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...