Tuesday, August 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूज​Simhastha Fake Work Order Case : तीनपेक्षा जास्त बँकांतील खाती गोठवली; तीन...

​Simhastha Fake Work Order Case : तीनपेक्षा जास्त बँकांतील खाती गोठवली; तीन कोटींचा फंड ट्रेल निष्पन्न

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थाच्या (Simhastha) नावाखाली बनावट कागदपत्रे (Fake Document) आणि शासानाच्या बनावट राजमुद्रेसह टेंडरचे खोटे वर्क ऑर्डर देऊन ३ कोटींहून अधिकचा गंडा घालणाऱ्या टोळीविरुद्ध नाशिक रोड पोलिसांनी (Nashik Road Police) तपासाचा फास आवळला आहे. प्रकरणातील मुख्य सूत्रधारांनी फसवणुकीची रक्कम ज्या इतर संशयितांच्या बँक खात्यांवर वर्ग केली होती, त्या ३ ते ६ क्रमांकाच्या चारही संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपासात संशयितांच्या राष्ट्रीयीकृत व सहकार क्षेत्रातील तीनपेक्षा अधिक बँकांमधील खात्यांत तब्बल ३ कोटींची रक्कम आढळली असून पोलिसांनी ही खाती तातडीने गोठवली आहेत.

- Advertisement -

​पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी दिलेल्या आदेशानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील जामनेर परिसरातून या सर्व सहा संशयितांना गजाआड केले आहे.​मुख्य संशयित तनय अनंत महाजन(रा. पाचोरा रोड, जामनेर, जि. जळगाव), नरेंद्र तोताराम महाजन(रा. देशमुख गल्ली, जामनेर, जि. जळगाव) व शोएब अहमद अब्दुल सत्तार शेख(रा. रा. गणेशवाडी रोड, जामनेर, जि. जळगाव) यांनी पाचही कंत्राटदारांचा विश्वास संपादन करून हाऊसकीपिंग आणि इतर कामांचे बनावट वर्क ऑर्डर दिले.

त्यानंतर उकळलेले तीन कोटी रुपये संशयित शोएब शेख, अब्दुल रईस शेख, शकील अहमद शेख आणि मोहम्मद वसीम यांच्या विविध बँकांतील खात्यांवर ट्रान्सफर केले. नाशिक रोड पोलिसांनी या सर्व खात्यांचे डिजिटल व फायनान्शियल ऑडिट सुरू केले असून, खात्यांतील तीन काेटी रुपये जप्त करण्याची कायदेशीर कारवाई (Action) वेगाने सुरू केली आहे.

मोडस ऑपरेंडी अशी

संशयितांनी केंद्र सरकारच्या बनावट राजमुद्रेसह खोट्या डिजिटल स्वाक्षऱ्या, बनावट याद्या आणि नाशिक महापालिकेच्या टेंडर नोटीसचा गैरवापर करून हुबेहूब वर्क ऑर्डर तयार केल्या. त्यात, आधी एका कंत्राटदाराला हेरुन त्यानंतर इतरांना भूलवून गंडा घातला. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात वरील संशयितांवर एकूण पाच गुन्हे नाेंद आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही शासकीय कर्मचारी किंवा बडे चेहरे सहभागी आहेत का? बनावट कागदपत्रे आणि डिजिटल स्वाक्षऱ्या कुठे तयार झाल्या? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

अटक संशयित आणि पोलीस कोठडी

​तनय अनंत महाजन – १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
​नरेंद्र तोताराम महाजन – १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
​शोएब अहमद अब्दुल सत्तार शेख – १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
​अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख) – १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी)
​शकील अहमद सलीमुद्दीन शेख – पाेलीस काेठडीत
​मोहम्मद वसीम अब्दुल गफ्फार – पाेलीस काेठडीत

ताज्या बातम्या

Ahilyanagar : यंदा 11 दिवस दिवाळीच्या सुट्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदाच्या शैक्षणिक वर्षात (2026-27) मध्ये जिल्ह्यातील शाळांना दिवाळीच्या 11 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यात 4 ते 14 नोव्हेंबर या काळात या सुट्ट्या...