नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्रींचा काँग्रेस (Congress) पुरस्कृत ए.आय व्हिडीओ वरुन शहरात राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) नाशिकमध्ये (Nashik) भाजप महिला आघाडीच्या वतीने रविवार कारंजा येथे आंदोलन (Protest) करून खासदार राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
बिहार काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून (X Account) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआय पुरस्कृत व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये मोदींच्या स्वप्नात त्यांच्या आई (Mother) त्यांच्यावर ओरडताना दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.
यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार आणि जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी ‘अशा प्रकारचे एआय (AI) आधारित व्हिडीओ तयार करून काँग्रेस राजकारणातील खालचा स्तर गाठत असल्याचा आरोप केला.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आईचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही, असा इशारा दिला. तसेच काँग्रेस पक्षाच्या या राजकारणाचा धिक्कार असो, अशा घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान, यावेळी महिला मोर्चा (Mahila Morcha) नाशिक महानगर अध्यक्ष स्वाती भामरे, अमीत घुगे, देवद्त्त जोशी, उत्तम उगले, महेश भामरे, अनीता भामरे, बबलु परदेशी, राहुल कुलकर्णी, वसंत उशीर यांच्यासह आदी उपस्थित होते.




