Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशकात आगमन

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशकात आगमन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) असून, त्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. तसेच विविध कार्यक्रम देखील होणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही वेळापूर्वीच नाशिकमधील ओझर विमानतळावर (Ozar Airport) आगमन  झाले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे ग्रंथ देवून स्वागत केले.

- Advertisement -

याप्रसंगी आमदार सीमा हिरे, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री,, पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार आदी उपस्थित होते.

YouTube video player

बैठकीला तीन मंत्री व १३ आखाड्यांचे महंत

सिंहस्थ कुंभमेळा बैठकीला तीन मंत्री उपस्थित राहणार असून, सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन,शिक्षणमंत्री दादा भूसे व अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल हे उपस्थित राहणार आहेत. या सोबतच नाशिकचे ३ व त्र्यंबकेश्वरचे १० आखाड्यांचे महंत या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे.

सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा अलर्ट

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सुरक्षा बंदोबस्ताची तपासणी केली आहे. वाहतूक नियमन, प्रवेश मार्ग आणि पार्किंग व्यवस्थेबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. कर्मचारी आणि अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...