Monday, July 27, 2026
HomeनाशिकNashik News : गोवर्धन ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तुफान राडा; पोलिसात तक्रार दाखल, Video...

Nashik News : गोवर्धन ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तुफान राडा; पोलिसात तक्रार दाखल, Video व्हायरल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) गोवर्धन ग्रामपंचायतीची (Govardhan Gram Panchayat) ग्रामसभा सुरु असताना दोन गटांत राडा झाल्याची घटना घडली आहे. सरपंच गोविंद डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा (GramSabha) आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुरुवातीला महिला ग्रामसभा तर नंतर जनरल ग्रामसभा होणार होती.

- Advertisement -

मात्र, ग्रामसभेमध्ये रेकॉर्डिंग करण्याच्या प्रश्नावरून वादाला सुरुवात झाली. यावेळी सरपंच गोविंद डंबाळे यांनी रेकॉर्डिंगला विरोध केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी (Citizen) त्यावर आक्षेप घेतल्याने या वादाला तोंड फुटले आणि त्यानंतर परस्परांमध्ये बाचाबाची झाल्याने वाद (Dispute) वाढून त्याचे परिवर्तन हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटांकडून महिला व पुरुषांमध्ये थेट हाणामारी झाली.

दरम्यान, याप्रकरणी गोवर्धन ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) माध्यमातून ग्रामीण पोलिसात (Rural Police) तक्रार करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनीही परस्परविरोधी तक्रार (FIR) दाखल केली असून, ग्रामीण पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

0
जंतरमंतरच्या ऐतिहासिक मैदानावर नुकताच घडलेला घटनाक्रम भारताच्या तरुणाईच्या अफाट ताकदीची आणि संघटित ऊर्जेची साक्ष देणारा ठरला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या ‘जेन झी’ पिढीचे प्रतिनिधित्व...