Friday, May 3, 2024
Homeनाशिकधक्कादायक : नाशिकमध्ये ‘करोना’चा पहिला बळी; सिन्नरहून आलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू

धक्कादायक : नाशिकमध्ये ‘करोना’चा पहिला बळी; सिन्नरहून आलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा तीन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला होता. आज या महिलेचा अहवाल करोना बाधित आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात करोना तपासणीची लॅब असतानाही तीन दिवसांनी जिल्हा रुग्णालयास अहवाल प्राप्त झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

महिला रुग्णालयात १ मे रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेची प्रकृती चिंताजनक होती, तिच्यावर ताबडतोब उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारास या महिलेने प्रतिसाद न दिल्याने तिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

महिला बजरंग वाडी परिसरातील आहे; आजच या महिलेचा सकाळी अहवाल करोना बाधित आढळून आला आहे. यामुळे नाशिकमध्ये करोना बाधित पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिनांक २८ एप्रिल रोजी ही महिला सिन्नरहून बजरंगवाडी येथे माहेरी आलेली होती. सिन्नर तालुक्यातून कोणत्या गावाहून ही महिला आलेली होती? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

मात्र, सिन्नर तालुक्यात या महिलेच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. १ मे रोजी ही महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला होता.

महिलेला करोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे तिच्या घशातील नमुने तपसणीसाठी पाठविण्यात आले होते. आज हे अहवाल प्राप्त झाला असून महिला करोनाबाधित सिद्ध झाली आहे.

दरम्यान, या महिलेच्या अंत्यसंस्काराला कोण कोण उपस्थित होते. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासन घेत असून महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चौकशी केली जात असून त्यांना तात्काळ स्थानबद्ध केले जाणार आहे. संशयित रुग्णांच्या घशाचे स्राव तपासणीला पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

नाशिक (बजरंगवाडी )येथील ह्रदय विकार असलेल्या २० वर्षीय गरोदर महिला २ तारखेस सिव्हिल मध्ये सिरीयस स्थितीमध्ये उपचारासाठी आल्या होत्या.त्यांच्यावर उपचार सुरू असताना साधारण २ तासांत त्यांचा मृत्यू झाला होता. २ तारखेची ही घटना आहे. आज त्यांचा स्वाबचा अहवाल प्राप्त झाला. यात महिला करोना पॉझिटीव्ह आलेल्या आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या