Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिककरांनो आता तरी सावध व्हा! चार दिवसांतच रुग्णसंख्या 'दुप्पट'

नाशिककरांनो आता तरी सावध व्हा! चार दिवसांतच रुग्णसंख्या ‘दुप्पट’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नववर्ष नवसंकल्पांचे, आनंदाचे मानले जाते. मात्र, नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District Covid Situation) २०२२ या नवीन वर्षाच्या पहिल्या चार दिवसांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. यामुळे नाशिककरांनी करोनाविरुद्धाच्या लढ्यासाठी निर्बंधाचे पालन करणे गरजेचे झाले आहे….

- Advertisement -

३१ डिसेंबर २०२१ च्या अहवालानुसार, नाशिक जिल्ह्यामध्ये ४८७ रुग्णांवर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु होते. तर आज (दि ४) रोजी जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या अहवालात नाशिकच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८३१ वर पोहोचली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांत यात करोनामुक्त झालेल्यांची संख्याही मोठी असल्याने आज जी संख्या वाढलेली दिसते आहे, ती चिंता व्यक्त करण्यासारखीच आहे.

गेल्या चार दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाल्यामुळे चिंतेचे मळभ अधिकच दाटलेले दिसून येत आहेत. ३१ डिसेंबर रोजी नाशिक तालुक्यात २१, बागलाणमध्ये १३, चांदवडमध्ये ०४, देवळा १६, दिंडोरी २२, इगतपुरी ०८, मालेगावात ०१, नांदगावात ०३, निफाडमध्ये ४९, सिन्नरमध्ये १५, सुरगाणा ०३, त्र्यंबकेश्वर ०२, येवला ११ असे एकूण १६८ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू होते.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात (Nashik Municipal corporation) ३०२, मालेगांव महानगरपालिका (Malegaon Municipal corporation) क्षेत्रात ०८ तर जिल्ह्याबाहेरील ०९ रुग्ण असून असे एकूण ४८७ रुग्णांवर उपचार सुरु होते.

तर आज (दि ०४) रोजी आलेल्या अहवालानुसार, नाशिक ग्रामीणमध्ये (Nashik Rural) ३९, बागलाणमध्ये १५, चांदवड ०५, देवळा १६, दिंडोरी ५७, इगतपुरीत ०९, मालेगाव ०५, नांदगाव ०७, निफाड ५१, सिन्नर २३, सुरगाणा ०२, त्र्यंबकेश्वर ०५, येवला ०६ असे एकूण २४० पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५४८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तिकडे मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १० तर जिल्ह्याबाहेरील ३३ रुग्ण आहेत. यामुळे हा एकदा ८३१ वर पोहोचला आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले रुग्ण असे

नाशिक ०३

बागलाण ०१

देवळा ०१

दिंडोरी ०९

इगतपुरी ०१

कळवण ०१

मालेगाव ०१

नांदगाव ०२

निफाड १२

सिन्नर ०४

त्र्यंबकेश्वर ०१

एकूण – ३६

नाशिक शहरात वाढलेले रुग्ण असे

नाशिक मनपा- 151

जिल्हाबाह्य – २९

- Advertisment -

ताज्या बातम्या