Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : ...अन् डीजेच्या तालावर थेट ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर नाचल्या नर्तकी;...

Nashik News : …अन् डीजेच्या तालावर थेट ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर नाचल्या नर्तकी; Video आला समोर

निफाड | प्रतिनिधी | Niphad

चांदवड-सिन्नर महामार्गावर (Chandwad-Sinnar Highway) असणाऱ्या शिवरे गावात (Shivare Village) शुक्रवार (दि.२२ ऑगस्ट) रोजी रात्री बैलपोळ्याच्या (Bail Pola) मिरवणुकीच्या निमित्त काही उत्साही मंडळींनी बाहेर गावाहून नर्तकी बैलापोळा साजरा करण्यासाठी किंवा बैलांच्या मिरवणुकीच्या निमित्ताने नाच गाण्यासाठी आणल्या होत्या.

- Advertisement -

बैलपोळ्याचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी डीजे (DJ) बरोबर बैलजोडीच्या समोर या नर्तकी नाचत होत्या व त्याला प्रतिसादही उत्तम मिळत होता. परंतु, या उत्साहाच्या भरात नर्तकी थेट शासकीय कार्यालय असलेल्या शिवरे ग्रामपंचायतीच्या (Shivare Grampanchyat) कार्यालयावर जाऊन नाचत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Socali Media) व्हायरल झाल्याने निफाड तालुक्यात (Niphad Taluka) याबाबत एकच खळबळ उडाली आहे.

YouTube video player

दरम्यान, बैल पोळ्याची मिरवणूक सोडून नर्तकी (Dancer) या उत्साहाच्या भरात शासकीय इमारतीवर जाऊन नृत्य करत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर प्रशासनाने याबाबत नाशिक जिल्हा परिषद व निफाड पंचायत समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच निफाड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होतो की नाही? याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहे.

पोळ्या निमित्त शासकीय सुट्टी तसेच शनिवार हा सुट्टीचा दिवस असल्याने वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शिवरे ग्रामपंचायतीवर नर्तकी नाचल्याचा विषय समजला आहे. शिवरे ग्रामपंचायतीवर प्रशासक राजवट लागू आहे. त्यात ग्रामपंचायतीवर ग्रामसेविका याच प्रशासक म्हणून तेथे कार्यरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला दोन दिवस सुट्टी असल्याने तसेच ग्रामपंचायत कार्यालय हे सायंकाळी पाच वाजेनंतर बंद होते. त्यामुळे तेथे काय घटना घडतात याकडे ग्रामसेवक व शासकीय कर्मचारी नसल्याने तिथे काय घडले हे कर्मचाऱ्याला व अधिकारी यांना माहिती नाही. याची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवला जाणार आहे.

नम्रता जगताप, गटविकास अधिकारी, निफाड

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...