शिरवाडे वाकद | वार्ताहर | Shirwade wakad
खेरवाडी शिवारात (Kherwadi Shivar) रेल्वे रुळावर युवक व विवाहीत युवतीचा (Youth and Married Woman) छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Fraud : एलआयसीला दोन कोटींचा गंडा
रेल्वे कर्मचारी किरण कर्डक यांनी कळविले वरुन पोलीस पाटील तेजल संदीप पवार यांनी फोनद्वारे सायखेडा पोलिसांना (Saykheda Police) खबर दिली की, शनिवार (दि.३० नोव्हेंबर) रोजी रात्री १ वाजेपूर्वी खेरवाडी शिवारात रेल्वे लाईन जवळील पोल नं.२०७/९ जवळ एक अनोळखी पुरुष वय अंदाजे २८ वर्षे व एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे २० वर्षे हे रेल्वे कटींग होऊन विछिन्न अवस्थेत पडलेले आहे.
हे देखील वाचा : World AIDS Day : नाशिक जिल्ह्याची एड्समुक्तीकडे वाटचाल
त्यानंतर सायखेडा पोलीस तातडीने घटनास्थळी तात्काळ हजर झाले असता तेथे एक मोबाईल (Mobile) मिळुन आला. सदर मोबाईलवरुन नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मयत पुरुषाचे नाव अश्विन नवनाथ शिंगाडे (वय ३० वर्षे रा.दात्याने (दिक्षी) ता.निफाड) असे असल्याचे समजले. तर मयत अनोळखी स्त्री (वय २७ वर्षे रा.रामकृष्ण नगर, साईभक्ती अपार्टमेंट प्लॅट नं.१, इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे, मखमलाबाद, नाशिक ) असे असल्याचे तिचे पतीकडून कळले.
हे देखील वाचा : Nashik Crime : बेलतगव्हाण येथे दरोडा; पाच जणांवर गुन्हा
दरम्यान, याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात अ.मू.रजि.नं ४७/२०२४ भा.न्या.सु.सं.कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे. तर अधिक तपास सपोनि विकास ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.जाधव करीत आहेत.