Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : हरकतींचा पाऊस; प्रारूप मतदार यादींवर हरकतींसाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Nashik News : हरकतींचा पाऊस; प्रारूप मतदार यादींवर हरकतींसाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेने (Nashik NMC) २० नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवर (Voter List) राजकीय पक्षांच्या नेत्यांसह नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असून, बुधवारी तब्बल ११०५ हरकती नोंद झाल्यामुळे एकूण आकडा २०३८ वर पोहोचला दरम्यान, राज्यातील आहे. २६ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती व तक्रारी दाखल होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबरवरून ३ डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश काढले आहे.

- Advertisement -

मतदार याद्यांमधील त्रुटींच्या तक्रारींमध्ये विशेषतः नवीन नाशिक विभाग आघाडीवर असून सर्वाधिक हरकती या विभागातून दाखल झाल्या आहेत. नाव दुरुस्ती, पत्ता बदल, नावे वगळणे, नवीन नोंदणी, मृत व्यक्तींची नावे टिकून राहणे, तसेच प्रभागांत विसंगती अशा विविध स्वरूपातील तक्रारी म हापालिकेकडे येत आहेत. वाढत्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने प्रत्येक विभागात विशेष तपासणी पथके नेमली असून, घरभेट, स्थळ पडताळणी आणि कागदपत्रांची एकट्या विभागातून १,३९७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नाशिकरोड विभाग असून येथून ३३२ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

YouTube video player

पंचवटी, सातपूर आणि महापालिका (NMC) मुख्यालय विभागांतही तक्रारींचा ओघ कमी आहे. सुरुवातीला २७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली होती; मात्र मोठ्या प्रमाणातील त्रुटी आणि वाढत्या तक्रारींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने आज मुदत वाढवून ती ३ डिसेंबर केली आहे. त्यामुळे नागरिकांना आपली नावे, पत्ते, दुरुस्त्या तपासण्यास आणि हरकती दाखल करण्यास अतिरिक्त वेळ मिळाला आहे.

दरम्यान, नवीन कार्यक्रमानुसार नागरिकांना (Citizen) आता ३ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची संधी मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादीच्या सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख १० डिसेंबर २०२५ अशी असेल. १५ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करावी लागेल. तर २२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

विभागनिहाय तक्रारी

महापालिका मुख्यालय ०७८
पंचवटी १५०
नाशिक पश्चिम ०२४
नाशिक पूर्व ०२६
सातपूर ०३१
नवीन नाशिक १३९७
नाशिकरोड ३३२
एकूण २०३८

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...