नाशिक | Nashik
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा येथील काही तरुण (Youth) हे मुंबईला राज्यराणी एक्सप्रेसने (Rajya Rani Express) अभिवादन करण्यासाठी जात असताना निफाड ते खेरवाडी दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेत त्यांच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. यानंतर हल्ला करणाऱ्यांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर चैन पूलिंग करून पळ काढला असता संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत या तरुणांना अटक होत नाही तोपर्यंत गाडी जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्यराणी व सेवाग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या खेरवाडी स्थानकात खोळंबल्याचे पाहायला मिळाले.
हे देखील वाचा : Sanjay Raut : “दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिंमत एकनाथ शिंदेंमध्ये नाही”; शपथविधीआधी राऊतांनी डिवचलं
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्या ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. मुंबई येथील चैत्यभूमीवर (Chaityabhoomi) देशभरातील लाखो अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात, पाच तारखेपासूनच हे सर्व जण यायला सुरुवात होते. यात आज मराठवाडा येथील काही तरुण राज्यराणी एक्सप्रेसने जात असतानाच निफाड ते खेरवाडी दरम्यान काही चोरट्यांनी त्यांच्याकडील पैसे (Money) हिसकावून घेतले.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : अखेर फडणवीसांच्या प्रयत्नांना यश; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
यानंतर त्यांना विरोध केला असता त्यांनी या तरुणांवर चाकूने हल्ला (Attack) केला, या हल्ल्यात तरुण जखमी झाले. मात्र या सगळया गडबडीत या चोरट्यांनी खेरवाडी स्थानक येताच चैन पूलिंग केली व पळ काढला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी रेल रोको करत जोपर्यंत या तरुणांना अटक होत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. यामुळे या स्थानकात राज्यराणी व सेवाग्राम या गाड्या खोळंबल्या होत्या. या घटनेमुळे रोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर काही वेळाने या गाड्या मार्गस्थ झाल्या.