Tuesday, April 22, 2025
HomeनाशिकNashik News: नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा 'पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार...

Nashik News: नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३’ ने सन्मान

नाशिक | प्रतिनिधी
नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या १२ प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार ‘जिल्ह्यांचा समग्र विकास’ श्रेणीत मिळाला.

१७ व्या नागरी सेवा दिनानिमित्त काल विज्ञान भवन येथे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागामार्फत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याने आयुष्मान भारत, पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, उज्वला योजना, मुद्रा योजना, पोषण आहार योजना, स्वनिधी योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यासह केंद्र सरकारच्या १२ प्रमुख योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात नाशिकच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत शर्मा यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता’ पुरस्कारात स्मृती करंडक, मानपत्र आणि २० लाख रुपये प्रोत्साहन निधी असे पुरस्काराचे स्वरूप असून, हा निधी नाशिक जिल्ह्यातील लोककल्याणकारी प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणण्यात येईल.

- Advertisement -

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल सर्व्हंन्ट्सना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी नागरी सेवेला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणत कार्यक्षमता, पारदर्शकता, इक्यू टीक्यू आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले. नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट या मंत्रासह ‘विकसित भारत’च्या दिशेने मार्गदर्शन केले. यावेळी २०२३-२४ मधील उत्कृष्ट प्रशासकीय उपक्रम असलेल्या ई-बुक्सच्या मालिकेचेही अनावरण करण्यात आले.या पुरस्कार वितरण समारंभात डॉ. जितेंद्र सिंग, टी. व्ही. सोमनाथन, व्ही. श्रीनिवास व शशिकांत दास, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व सनदी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३ ने सन्मानित झाल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कोर अरोरा यांनी जलज शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सर्व सामान्य नागरिक केंद्रबिंदू’ या दृष्टिकोनानुसार राबवण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांची अंमलबजावणी जिल्हास्तरावर प्रभावीपणे करण्यात येईल, असा निर्धारही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

हा पुरस्कार नाशिकच्या जनतेचा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे. सॅचुरेशन अप्रोचचा अवलंब करत आम्ही प्रत्येक योजनेला गती दिली. केंद्र सरकारच्या योजनांना स्थानिक गरजांशी समन्वय साधून प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला त्यातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. हा पुरस्कार आम्हाला यापुढेही प्रेरणा देत राहील.
जलज शर्मा, जिल्हाधिकारी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dr. Shirish Valsangkar: डॉ. c प्रकरणात नवा खुलासा; रुग्णालयात आरोपी मनिषाकडून...

0
सोलापूर | Solapur डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर सोलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी १८ एप्रिल रोजी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या...