Thursday, August 20, 2026
HomeनाशिकNashik Earthquake News : दिंडोरी, पेठ तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

Nashik Earthquake News : दिंडोरी, पेठ तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

दिंडोरी | Dindori

दिंडोरी तालुक्यातील वारे आणि वनारे परिसर, पेठ तालुक्यातील पवारपाडा, गावानपाडा आणि सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) सौम्य धक्के बसले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये (Citizen) भीती पसरली आहे.

- Advertisement -

दिंडोरी व पेठ तालुक्यात (Dindori and Peth Taluka) सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असून, त्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात आहे. जनतेला भूकंपाची जाणीव होत नाही. मात्र, आज ती झाली. माजी आमदार धनराज महाले (Dhanram Mahale) हे वारे येथे असताना त्यांना भूकंपाचा धक्का जाणवला. यावेळी त्यांचे घर व टीव्ही हादरले.

तसेच पेठ तालुक्यातील पवारपाडा, गावानपाडा परिसरात ३.३० वाजेच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. याप्रकरणी दिंडोरी आणि पेठ तहसील कार्यालयाकडून अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात तातडीने भूकंप मापक यंत्रणा (Earthquake Monitoring System) बसवावी अशी मागणी माजी आमदार महाले यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : अमेरिकेतील युद्धाच्या धोरणामुळेच डांबराची टंचाई

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे डांबराची टंचाई निर्माण होऊन नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या आपल्या...