Friday, September 4, 2026
HomeनाशिकNashik News : मोकाट गायींची लढाई वृद्धाच्या जीवावर बेतली

Nashik News : मोकाट गायींची लढाई वृद्धाच्या जीवावर बेतली

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

- Advertisement -

मोकाट फिरण्याऱ्या दोन गायींच्या (Cows) लढाईत एका वृद्धाला नाहक प्राण गमवावे लागले. हा हृदयद्रावक घटना कळवणमध्ये (Kalwan) घडली. या प्रकारामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कळवण शहरातील (Kalwan City) जुना ओतूररोडवरील कळवण मर्चेंट्स को ऑफ बँकेजवळील श्री सायबर कॅफेसमोर मोकाट जनावरांपैकी दोन गायी एकमेकांना भिडल्या. यावेळी भालचंद्र रघुनाथ मालपुरे (८५) रा. छत्रपती शिवाजीनगर कळवण हे वृद्ध रस्त्याने जात असतांना या गायींनी मालपुरे यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटत पायाखाली तुडवले.

दरम्यान, यामुळे गंभीर जखमी झालेल्या मालपुरे यांना नागरिकांनी (Citizen) कळवण उपजिल्हा रुग्णालयात (Kalwan Rural Hospital) दाखल केले. उपचारादरम्यान मालपुरे यांचा मृत्यू (Death) झाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...