Friday, May 3, 2024
Homeनाशिकउपक्रमशील शिक्षक गोकुळ वाघ यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान

उपक्रमशील शिक्षक गोकुळ वाघ यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान

येवला | प्रतिनिधी

आदर्श संस्कार शाळा ब्रिज भूमी मथुरा, उत्तर प्रदेश यांच्याद्वारे गेल्या ३५ वर्षांपासून देशभरातील आदर्श व्यक्तिमत्व चा सन्मान केला जात आहे.

- Advertisement -

यात शिक्षक, लेखक, साहित्यिक, पत्रकार, इंजिनियर, चित्रपटसृष्टी, फॅशन डिझायनर, समाजसेवक, ईत्यादिंचा सहभाग असतो.

यावर्षी देशभरातील २७ राज्यातील ९० गुणिजणांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातू राज्यस्तरीय शिक्षणाची वारी, स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांसाठी बालरक्षक म्हणून राज्यस्तरावर करत असलेले काम व शाळेत विविध उपक्रम राबविणे इत्यादी कामांची दखल घेऊन, उपक्रम शील शिक्षक व राज्यबालरक्षक गोकुळ वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक यांची राष्ट्रिय आदर्श शिक्षा रत्न या पुरस्कारासाठी निवड झाली असून ४ रोजी मथुरा येथेगौरविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या