ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) एकीकडे कृषीक्षेत्रात नवनवीन प्रयोग करीत वाटचाल सुरू असली तरी दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती व बाजार भावाचा (Market Price) फटका बसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकामध्ये थकीत झाल्यामुळे बँकांनी थकीत शेतकऱ्यांना जमिनीच्या (Land) लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात केल्यामुळे कर्जबाजारी शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणी पळाले असून जगाचा पोशिंदा भूमिहीन होणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्याच्या युतीच्या सरकारने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतीसाठी मोफत वीज तर महिलासाठी लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे जनतेमध्ये या सरकारबद्दल सहानुभूती निश्चित आहे. मात्र, दुसरीकडे जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर त्याच्या काळजाच्या तुकड्याचा लिलाव होणार असेल तर ही बाब विचार करायला लावणारी असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत बँकांची सक्तीची वसुली व जमीन लिलाव प्रक्रिया थांबलेली होती. मात्र महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन सरकार येताच जमिन लिलाव व सक्तीच्या वसूलीला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिंडोरी तालुका कृषीक्षेत्रात सदन समजला जाते सहाजिकच धरणे व नद्यांचा परिसर असल्यामुळे बऱ्याच भागात बारमाई शेती केली जाते.डोंगराळ भागातील शेतकरी वर्गाने सुद्धा आपल्या शेतीची सपाटीकरण करून माळरानावर फळबागा लागवड केलेली आहे, मात्र वर्षानुवर्ष हवामानात होणारे बदल अवकाळी पाऊस,गारपीट,बेमोसमी पाऊस व बाजार भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा तोडण्याचा निर्णय घेतला.मात्र, सहकारी सोसाट्या व बँकांकडून घेतलेले कर्ज शेतकऱ्यांना वेळेवर देताना आल्यामुळे हे सर्व शेतकरी थकीत होऊन आज कर्जबाजारी झाले आहे. त्यात राष्ट्रीयकृत बँका ‘वन टाइम सेटलमेंट’ करून कर्ज भरून घेत आहे. मात्र सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँक यांच्या वन टाइम सेटलमेंट मध्ये जमीन आसमानाचा फरक असल्यामुळे शेतकरी सहकारी बँकांचे कर्ज भरू शकत नाही त्यामुळे सहकारी बँकांनी सध्या थकीत शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव (Auction) करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यातील शेतकरी वर्गाने बँकांकडून कर्ज घेऊन पॉलिहाऊस उभारले तर काही द्राक्षबागाची लागवड केली मात्र प्रत्येक वर्षी निसर्गाच्या अस्मानी सुलतानी संकटांनी शेतकरी हैरान झाला,मात्र पुढील वर्षी काही तरी चांगले होईल या आशेवर राहून भांडवल उभे करीत राहिला मात्र बाजारभाव व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी होत राहिला आहे. कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती व बाजारभाव यामुळे शेतकरी वर्गाला सहकारी बँकासह सर्वच बॅकाचे कर्ज भरता आली नाही.त्यात पुन्हा दोन वर्ष करोना माहामारीने शेतकरी उध्वस्त झाला.मात्र शेतकरी वर्गाने या काळात आपला शेती व्यवसाय बंद केला नाही.
देशातील सर्व सामान्य मानसा पर्यंत आपल्या शेतात पिकणारे अन्नधान्य, फळे , भाजीपाला शेतकरी राजाने देशाला पुरविला यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू सुद्धा झाला घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली, यांची दाखल कुठे तरी शासन व्यवस्थेने घेऊन सध्या संकटात असलेल्या शेतकऱ्यावर मेहरबानी करण्याचा विचार करून होणारे जमिनीचे लिलावा थांबविले पाहिजे.नाही तर मोठा अनर्थ होऊन शेती व्यवसाय धोक्यात येवून जगाचा पोशिंदा उध्वस्त होईल व संपूर्ण शेती व्यवसाय धोक्यात येवू शकतो.आशी चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहे.