नाशिक | Nashik
नाशिक-मुंबई महामार्गालगत (Nashik-Mumbai Highway) असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री १ वाजता आग लागली होती. ही आग (Fire) विझवण्यासाठी प्रशासानाकडून अथक प्रयत्न करण्यात आले. परंतू, ही आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असून, अद्यापही ती पूर्णतः आटोक्यात आलेली नाही.
काल सकाळी थोड्या फार प्रमाणात आग आटोक्यात आली होती. मात्र सायंकाळी या आगीने पुन्हा रौद्ररूप घेतले होते. यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा आगीने पेट घेतला असून, संपूर्ण परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आकाशाच्या दिशेने झेपावत आहेत.
तसेच, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक, ठाणे, मुंबई, मालेगाव महापालिका आणि इतर नगरपालिकांमधून ३० ते ४० अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले गेले आहेत. तर पाणी आणि फोमच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कंपनीच्या (Company) आतमध्ये असलेल्या गॅस टाक्या फुटल्यास परिसरातील १५ ते २० किलोमीटर अंतरावर धोका होऊन खुप मोठी जीवीतहानी होऊ शकते. त्यामुळे हा परिसर निर्मनुष्य करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असून, कंपनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे.