Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात करोना टेस्टिंग लॅब सुरु झाली; पहिला अहवाल आला निगेटिव्ह

नाशकात करोना टेस्टिंग लॅब सुरु झाली; पहिला अहवाल आला निगेटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते कोविड-१९ तपासणी लॅबचे उदघाटन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मविप्र मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, दातार लॅबचे प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

नाशिकमध्ये सुरु झालेल्या या लॅबमुळे कमीत कमी वेळात अहवाल प्राप्त होणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी ही लॅब अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

आज पहिला नुमुना तपासणीसाठी याठिकाणी नेण्यात आला होता. हा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एका मशीनवर एका दिवसात 180 नमुने तपासण्याची सुविधा आहे.

दुसरे मशीनचे कॅलिब्रेशन करून ही क्षमता 360 वर नेली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून व अनेक अति क्लिष्ट बाबींची पूर्तता केल्यामुळे ही टेस्टिंग लॅब सुरु झाली आहे.

यामुळे नाशिकमध्ये स्वॅब तपासणीचा मार्ग मोकळा झाला असुन नाशिकमधील संशयितांचे करोना निदान त्वरीत होण्यास मदत मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या