Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुरड्यावर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांनी फोडला हंबरडा

Nashik News : बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुरड्यावर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांनी फोडला हंबरडा

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील वडनेर दुमाला गावात शुक्रवारी (दि.०८) रोजी रात्री आयुष किरण भगत या चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने (Leopard Attack) हल्ला करून त्याला जवळ असलेल्या एका शेतात ओढत नेले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी तसेच वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी व नातेवाईकांनी तब्बल साडेतीन तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह रात्री बारा वाजेच्या सुमारास गावा लगतच्या ऊसाच्या मळ्यात आढळून आला होता.यानंतर त्याच्यावर आज (शनिवारी) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.

- Advertisement -

गेल्या दोन ते चार दिवसापासून नाशिकरोडच्या (Nashik Road) जय भवानी रोड येथे बिबट्याचा वावर सुरू आहे. या घटना ताज्या असतानाच वडनेर दुमाला येथे आयुष किरण भगत या चार वर्षाच्या बालकाला (Boy) बिबट्याने घराबाहेर ओट्यावरून ओढत नेले व त्याच्यावर हल्ला करून जवळच असलेल्या शेतात नेले. या घटनेनंतर नातेवाईक व आजूबाजूच्या नागरिकांना शोधमोहीम सुरू करून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर तातडीने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी ड्रोनच्या साह्याने व्यापक शोधमोहीम राबवली.

YouTube video player

Nashik Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

या मोहिमेमध्ये उपनगर पोलीस ठाण्याचे (Upnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे श्वान पथक (डॉग स्कॉड), गुगल श्वान, स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी युवक, आणि वनविभागाचे अधिकारी सक्रिय सहभागी होते. या शोध मोहिमेदरम्यान घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग व थोड्या अंतरावर मुलाची पॅन्ट आढळून आली होती. त्यानंतर तातडीने व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. या शोध मोहिमेत गावकरी तसेच माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम कोठुळे यांच्यासह आदी वडनेर गेट, वडनेर गाव, कारगिल गेट, विहितगाव परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग होता. मात्र दुर्दैवाने आयुषचा मृतदेह हाती लागल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, आयुषचे वडील किरण भगत हे खाजगी कंपनीत (Private Company) काम करत असून, त्यांना एक मुलगी आणि आयुष हा मुलगा होता. मात्र, रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येलाच आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर दु:खाच्या सागरात बुडाला आहे. या दुर्दैवी घटनेने वडनेर दुमाला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे ठोस उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...