Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड; 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Nashik News : टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड; ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वणी | वार्ताहर | Vani

टोमॅटोच्या शेतात (Tomato Crops) लावलेली गांजाची झाडे (Ganja Trees) वणी पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून सुमारे ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भातोडे शिवारात रंगनाथ सोनू चव्हाण (वय ५१ रा.भातोडे ता.दिंडोरी जि. नाशिक) यांचे शेतात टोमॅटोचे पीक लावलेले होते. याच ठिकाणी जागोजागी गांजाची झाडे लावलेली होती, ही सर्व झाडे गांजा सदृश असून सहा प्लॅस्टिकच्या गोण्यात झाडासहीत भरली त्याचे वजन २०९.३२ किलोग्रॅम आहे. या गांजाची बाजारात सुमारे ४२ लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले जाते.

YouTube video player

दरम्यान, वणी पोलिसांनी (Vani Police) याबाबत गुन्हा नोंदविला असून गुंगीकारक औषध द्रव्य (Medicine) आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० व २२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...