सिद्ध पिंपरी | वार्ताहर | Siddha Pimpri
द्राक्ष शेतीत (Grape Cultivation) अग्रगण्य असलेला नाशिक जिल्हा (Nashik District) यावर्षी अति थंडीने (Cold) गारठला आहे. मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागल्याने द्राक्ष मणी फुगवणीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : नाशिक-पुणे रेल्वेला मिळणार गती
नाशिक जिल्हा हा कांदा, द्राक्ष, ऊस आदींमध्ये नेहमीच अग्रेसर आहे. मात्र यावर्षी वर्षभर अति पाऊस (Rain) झाल्याने द्राक्ष शेती कशीतरी शेतकऱ्याने वाचवली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या छाटणीनंतरही द्राक्षावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात पावसाचा परिणाम झाला आहे. बऱ्याच ठिकाणी द्राक्षाची प्रजनन शक्ती कमी प्रमाणात झाल्याने कमालीचे उत्पादन कमी झाले आहे. एका द्राक्ष झाडावर ५० ते ६० द्राक्ष संख्या असताना यावर्षी मात्र पंधरा ते बीस द्राक्ष संख्या आहे. असे असताना शेतकरी बगनि आपल्या लहान मुलासारखे त्याची जोपासना करून त्यांना वाचवले आहे. डोक्यावर कमालीचे कर्ज असताना नोव्हेंबर महिना पूर्ण द्राक्ष शेतीसाठी डावणी, गळकूज सारख्या रोगाने नुकसान केले आहे. त्यातच दिवाळीनंतर मजुरांचा तुटवडा ही मोठी समस्या शेतकऱ्यांना जाणवत होती.
हे देखील वाचा : Nashik News : रेल्वमार्ग भूसंपादन कामाला गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आपल्या लहान मुलांना (Little Boy) हाताशी धरून कशी तरी द्राक्ष शेती जिवंत ठेवली. परंतु असे असताना अचानक ६ अंशापर्यंत वाढलेल्या थंडीने द्राक्षावर मोठ्या प्रमाणात नुकसान जाणवत आहे. द्राक्षाला तडे जाणे हे प्रकार दिसू लागले आहेत. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने असेच वातावरण कमी झाले तर निश्चितच द्राक्ष उत्पादनावर याचा परिणाम होऊ शकतो आणि घर ही होऊ शकते, असे निदर्शनास आले आहे. कित्येक शेतकरी रात्री शेकोटी पेटवत आहे. द्राक्षाला उब देण्यासाठी विविध प्रकार करत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना अति थंडी त्रासदायक ठरू शकते, अशी परिसरातील शेतकरी करत आहे.
हे देखील वाचा : World Disability Day 2024 : कायदा झाला, पण दिव्यांग मुख्य प्रवाहात दिसेना!
मी सप्टेंबर महिन्यात द्राक्षाची छाटणी केली असून, अचानक वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष शेतीवर परिणाम होऊ शकतो. सकाळी द्राक्ष घडावर बर्फाचे छोटे-छोटे कण दिसू जागले आहेत. यामुळे द्राक्ष वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. फेब्रुवारीमध्ये द्राक्ष काढणीस येणार असताना सुद्धा फेब्रुवारीपर्यंत जर अशीच थंडी असेल तर निश्चितच द्वाक्ष शेती तोट्यात जावू शकते आणि उत्पादनही घटून परकीय चलनावर परिणाम होईल.
मनोहर सुखदेव ढिकले, द्राक्ष उत्पादक