Wednesday, January 15, 2025
HomeनाशिकNashik News : रेल्वमार्ग भूसंपादन कामाला गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nashik News : रेल्वमार्ग भूसंपादन कामाला गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील इगतपुरी ते नांदगावदरम्यान तिसरी व चौथी रेल्वेलाईन उभारण्याच्या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इगतपुरी ते नांदगावदरम्यान ( Igatpuri to Nandgaon) तिसरी व चौथी रेल्वेलाईन उभारण्याच्या प्रकल्पाच्या कामाच्या गती व स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प दृष्टीक्षेपात येण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भुजबळ-कांदे समर्थकांमध्ये बॅनरबाजी

मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ विभागातून दररोज १२५ हुन अधिक पॅसेंजर व मालगाड्यांची वाहतूक असते. त्यामुळे या मार्गावर अतिरिक्त ताण वाढल्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडत आहे. परिणामी प्रवाशांसोबत मालवाहतुकीलाही त्याचा फटका बसतो आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते भुसावळ अशा अतिरिक्त दोन लाईन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये भुसावळ-जळगावचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर नांदगावपासून ते इगतपूरी येथून मुंबईपर्यंत (Mumbai) नव्याने रेल्वेलाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात आवश्यक भूसंपादन करणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिल्लीतील महाशक्तीचा हात”; राऊतांच्या दाव्याने खळबळ

त्यानुषंगाने जिल्हाधिकारी शर्मा यांनी सोमवारी (दि.२) नाशिक, इगतपुरी, निफाड व येवला प्रांतधिकारी तसेच रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नांदगाव ते इगतपुरी या दोन शहरांमध्ये नव्याने तिसरी व चौथी लाईन उभारायची आहे. त्यासाठी गावनिहाय किती जमीन संपादित करणे आवश्यक आहे, किती गट प्रभावित होणार यासह अन्य सुक्ष्म बाबींची माहिती कागदावर उतरावी, असे निर्देश शर्मा यांनी चारही प्रांतांना दिले. निफाड तालुक्यात (Niphad Taluka) नव्याने उभारल्या जाणाऱ्या रेल्वे लाईनवर उड्डाणपुल प्रस्तावित आहे. त्याकरीता चार गावांमधील साधारणतः ८ हेक्टर क्षेत्र बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला! किती जण घेणार मंत्रीपदाची शपथ?

ड्रायपोर्टसंदर्भात स्वतंत्र बैठक

निफाड साखर कारखान्याच्या १०५ हेक्टर जागेवर ड्रायपोर्ट उभारण्यात येणार आहे. हे ड्रायपोर्ट मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाशी जोडले जाणार आहे. त्याकरता अंदाजे चार किलोमीटर रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. या रेल्वेलाईनसाठी सुमारे आठ हेक्टर खासगी क्षेत्र अधिग्रहीत केले जाणार आहे. त्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती निफाडच्या प्रांत हेमांगी पाटील यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या