Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामारहाण होवूनही बाचाबाची झाल्याची नोंद, वरिष्ठांकडून आश्चर्यकारक दबाव...?

मारहाण होवूनही बाचाबाची झाल्याची नोंद, वरिष्ठांकडून आश्चर्यकारक दबाव…?

जानोरी | वार्ताहर Janori

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कादवा म्हाळुंगी (Kadava Mhalungi) येथे प्रभारी मुख्याध्यापकाला अमानुष मारहाण झाल्याप्रकरणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. परंतु त्याच प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना मारहाणीऐवजी बाचाबाची झाल्याबाबत जबाब दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे….

- Advertisement -

अवघ्या जिल्ह्यात मुख्याध्यापकाला (Head Master) मारहाण झाल्याचे फोटो प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारीत झालेले असतांना यांच्या जबाबात बाचाबाचीची नोंद झालीच कशी? हिच मोठी संशयास्पद बाब असुन प्रकरण मिटविण्यासाठी विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांकडून तर दबाव आला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असून वरीष्ठ स्तरावरून याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथे प्रभाग मुख्याध्यापक भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना त्यांच्या शाळेतीलच शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. सदर माहिती कळताच तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी सदर घटनास्थळी तातडीने शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांना पाठवले.

ते दोघेही तेथे तात्काळ हजर होवून तेथील घटनेची माहिती घेवून संबंधित मारहाण झालेल्या मुख्याध्यापकांचा जबाब नोंदवून घेतला व त्यात मारहाणी ऐवजी बाचाबाची झाल्याची नोंद असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली.

परंतु तो पर्यंत अवघ्या जिल्ह्यात सदर मुख्याध्यापकाला मारहाण झाल्याचे फोटो प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारीत झाले होते व सर्व स्तरातून एक संतापाची लाट पसरली असतांनाच दुसरीकडे या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यापेक्षा वरिष्ठांकडून प्रकरणाला जागीच दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा केविलवाणा प्रकार दिंडोरी तालुक्यात दिसून आला ही एक शोकांतिकाच म्हणावी आहे.

दिंडोरीच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (Maharashtra state primary teachers society) वतीने या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला. परंतु वरिष्ठांकडून तसेच मारहाण केलेल्या संबंधित शिक्षकाच्या निकटवर्तीयांकडून त्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करू नये यासाठी दबाव येत असून त्यामुळेच दोन दिवस उलटून देखील सदर शिक्षकावर गुन्हा सुध्दा दाखल झाला नाही यामुळे दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे.

प्रभारी मुख्याध्यापकास शिक्षकाने बदडले

सर्व जिल्ह्यात या मारहाणीचा निषेध नोंदवला जात असतांनाच दोन दिवस उलटुनही साधा गुन्हा दाखल होत नसल्याने हा प्रकार नेमका काय? असा सवाल उपस्थित केला जात दोषी कोण? याचा शोध घेवून वरिष्ठांकडून कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

कादवा म्हाळुंगी येथील झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे या घटनेचा आम्ही निषेध नोंदवत दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली असून यातील दोषी कोण? याची चौकशी करून वरिष्ठांकडून कठोर कारवाई व्हावी हीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करतो.

सचिन वडजे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, दिंडोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या